Wednesday, March 31, 2021

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३२

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३२

अब्दुल ने एक खेचर आणि एक गाढव प्रत्येकी १५,००० रुपयांना विकले. त्यापैकी एका व्यवहारात २५ % नफा तर दुसऱ्या व्यवहारात त्याला २५% तोटा झाला. या संपूर्ण व्यवहारात अब्दुलला ........होईल?

➡️ उत्तर :- 

खेचर आणि गाढव यांची एकत्रित विक्री किंमत 

= १५,००० + १५,०००

= ₹ ३०,०००

खेचराची खरेदी किंमत x रुपये मानू.

नफा = २५%

➡️ जर खेचराची खरेदी किंमत १०० रुपये असेल तर त्याची विक्री किंमत १२५ रुपये असेल.

∴ x = १०० × १५,०००/१२५

∴ x = ४ × ३०००

∴ x = ₹ १२,०००

गाढवाची खरेदी किंमत y रुपये मानू.

तोटा = २५%

➡️ जर गाढवाची खरेदी किंमत १०० रुपये असेल तर त्याची विक्री किंमत ७५ रुपये असेल.

∴ y = १०० × १५,०००/७५

∴ y = ४ × ५०००

∴ y = ₹ २०,०००

➡️ गाढव आणि खेचर यांची एकत्रित खरेदी किंमत 

= २०,००० + १२,०००

= ₹ ३२,०००

येथे, 

विक्री किंमत < खरेदी किंमत 

∴ या व्यवहारात तोटा होईल.

∴ तोटा = खरेदी किंमत - विक्री किंमत 

          = ३२,००० - ३०,०००

          = ₹ २,०००

➡️ म्हणून या संपूर्ण व्यवहारात अब्दुलला ₹ २००० तोटा होईल.



© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशी गट्टी



Friday, March 26, 2021

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३१

 ✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३१

एका स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ३५% गुण मिळविणे आवश्यक होते. लक्षने त्या परीक्षेत १३१ गुण मिळवूनही पास होण्यासाठी त्याला ९ गुण कमी पडले तर एकूण किती गुणांची ती स्पर्धा परीक्षा होती?

➡️ उत्तर :-

ती स्पर्धा परीक्षा x गुणांची होती असे मानू.

लक्षने मिळविलेले गुण = १३१

उत्तीर्ण होण्यासाठी त्याला ९ गुण कमी पडले.

∴ त्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण = १३१ + ९ = १४०

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

x चे ३५% = १४०

∴ x × ३५ / १०० = १४०

∴ x = ( १४० × १०० ) / ३५

∴ x = ४ × १००

∴ x = ४००

➡️ म्हणून ती स्पर्धा परीक्षा एकूण ४०० गुणांची होती.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशी गट्टी

Wednesday, March 24, 2021

गणिताशी गट्टी प्रश्न क्र.१३०

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३०

इरा आणि सुचिकांत यांच्या वयाची बेरीज ४६ वर्षे असून त्यांच्या वयाचा गुणाकार २७३ आहे तर इराचे वय किती?

➡️ उत्तर :-

इराचे वय x वर्षे मानू.

∴ सुचिकांतचे वय = ( ४६ - x ) वर्षे

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

x ( ४६ - x ) = २७३

 ४६x - x²  = २७३

∴ ४६x - x² - २७३ = ०

∴  x² - ४६x + २७३ = ० 

∴  x² - ३९x - ७x + २७३ = ० 

∴  x ( x - ३९ )  - ७ ( x - ३९) = ० 

∴  ( x - ३९ ) ( x - ७ ) = ० 

∴   x - ३९  = ० किंवा  x - ७  = ० 

∴  x = ३९ वर्षे किंवा  x = ७ वर्षे

➡️ दिलेल्या पर्यायांचा विचार करता

इराचे वय = ७ वर्षे



© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी

 






Friday, March 19, 2021

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२९

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२९

एक संख्या ६७ पेक्षा जितकी मोठी आहे तितकीच ती १०३ पेक्षा लहान आहे तर ती संख्या कोणती?

➡️ उत्तर :-

समजा ती संख्या x आहे असे मानू.

➡️दिलेल्या माहितीनुसार,

x - ६७ = १०३ - x

∴ x + x = १०३ + ६७

∴ २x = १७०

∴ x = १७० / २

∴ x = ८५

➡️म्हणून ती संख्या ८५ आहे.



© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशी गट्टी


Wednesday, March 17, 2021

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२८

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२८

राजेशचा पहिल्या तीन महिन्यांचा सरासरी खर्च ₹ २२,००० होता तर पुढील नऊ महिने सरासरी ₹ १८,००० खर्च झाले आणि पूर्ण वर्षभरात ₹ ७२,००० ची बचत झाली तर राजेशचा महिन्याचा सरासरी पगार(उत्पन्न)  किती ?

➡️ उत्तर :-

राजेशचा महिन्याचा सरासरी पगार x रुपये आहे असे मानू.

➡️ राजेशचा पहिल्या तीन महिन्यांचा खर्च 

= ३ × २२,०००

= ₹ ६६,०००

➡️ पुढील नऊ महिन्यांचा खर्च 

= ९ × १८,०००

= ₹ १,६२,०००

➡️ संपूर्ण वर्षात राजेशने केलेली बचत = ₹ ७२,०००

∴ राजेशचे एका वर्षातील एकूण उत्पन्न 

= वार्षिक खर्च + वार्षिक बचत

= ( ६६,००० + १,६२,०००) + ७२,०००

= २,२८,००० + ७२,०००

= ₹ ३,००,०००

➡️ x = ३,००,००० /१२

∴  x = ₹ २५,०००

∴ राजेशचा एक महिन्याचा सरासरी पगार (उत्पन्न) ₹ २५,००० आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशी गट्टी


Friday, March 12, 2021

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२७

 ✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२७

परीक्षेत विशालला एका संख्येला २१ ने गुणायचे होते परंतु त्याने १२ ने गुणल्यामुळे त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा १८९ ने कमी आले. तर ती संख्या कोणती?

➡️ उत्तर :- 

ती संख्या x आहे असे मानू.

त्या संख्येला २१ ने गुणून येणारा गुणाकार = २१x

त्या संख्येला १२ ने गुणून येणारा गुणाकार = १२x

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

२१x - १२x = १८९

∴ ९x = १८९

∴ x = १८९ / ९

∴ x = २१

ती संख्या २१ आहे.


©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी

Wednesday, March 10, 2021

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२६

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२६

एका घड्याळाचे दर २५ मिनिटांनी तर दुसऱ्या घड्याळाचे दर ३० मिनिटांनी टोल पडतात. जर दोन्ही घड्याळांचे एकत्र टोल सकाळी ८ : ०० वाजता पडले असतील तर त्यानंतर खालीलपैकी किती वाजता टोल एकत्र पडतील?

➡️ उत्तर :- 

एका घड्याळाचे दर २५ मिनिटांनी तर दुसऱ्या घड्याळाचे दर ३० मिनिटांनी टोल पडतात. 

∴ २५ मिनिटे आणि ३० मिनिटे यांचा ल.सा. वि. 

= १५० मिनिटे

= २ तास ३० मिनिटे

दोन्ही घड्याळाचे एकत्र टोल सकाळी ८ : ०० वाजता पडले 

∴ त्यानंतर बरोबर अडीच तासांनी म्हणजे साडेदहा वाजता दोन्ही घड्याळाचे एकत्र टोल पडतील.


©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी