Wednesday, October 21, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२५

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२५

₹ २५००० रुपये द.सा.द.शे. ९ चक्रवाढ व्याजदराने दुप्पट होण्यासाठी किती वर्षे गुंतवावे?

➡️ उत्तर :-

येथे 

रास = A = ₹५०,०००

मुद्दल = P = ₹ २५,०००

दर = R = द.सा. द.शे. ९

मुदत = N =?

आपल्याला माहिती आहे की,

A =P { १ + R/१०० } ^N

५०००० = २५००० { १ + ९/१००}^N

२ = { (१०० + ९ ) /१०० } ^N

{१०९/१००}^N = २

log {१०९/१००}^N = log२

N log (१.०९) = log २

N × ०.०३७४ = ०.३०१०

N = ०.३०१० / ०.०३७४

N = ३०१०/३७४

N = ८.०४ वर्षे

➡️ म्हणून ती रक्कम दुप्पट होण्यास ८ वर्षे लागतील.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी




Friday, October 16, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२४

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२४

जलतरण तलाव एका नळाने ९ तासात भरतो. तर पूर्ण भरलेला तलाव रिक्त करण्यासाठी तळाशी असलेल्या आऊटलेट नळाला १२ तास लागतात. पूर्ण रिक्त असलेला तलाव भरण्यासाठी कर्मचाऱ्याने नळ चालू केला परंतु आऊटलेट नळ बंद करण्यास विसरला तर तो तलाव पूर्ण भरण्यास किती तास लागतील?

शॉर्टकट पद्धतीसाठी खालील शब्दांवर क्लिक करा.

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२४

➡️ उत्तर :-

दोन्ही नळ चालू राहिले तर तो तलाव x तासात भरतो असे मानू.

➡️म्हणून,

दोन्ही नळ चालू राहिले तर तो तलाव १/x इतका भरतो.

जलतरण तलाव एका नळाने ९ तासात भरतो.

➡️ म्हणून,

जलतरण तलाव एका तासात १/९ इतका भरतो.

जलतरण तलाव एका आऊटलेट नळाने १२ तासात पूर्ण रिक्त होतो.

➡️ म्हणून,

जलतरण तलाव एका तासात १/१२ इतका रिक्त होतो.

➡️ म्हणून,

दोन्ही नळ चालू राहिल्यास जलतरण तलाव एका तासात [१/९ -१/१२] इतका भरेल.

➡️ म्हणून,

१/x = (१/९) - (१/१२)

१/x = (४-३) / ३६

१/x = १/३६

x = ३६.

➡️तो जलतरण तलाव ३६ तासात भरेल.


©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशी गट्टी


Thursday, October 15, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२३

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२३

अतिशय अभ्यासू, सालस आणि सदैव प्रसन्नचित्त असणाऱ्या चंद्रकांत मर्गज सरांना मी त्यांचे वय विचारले तर तुम्ही गणिताचे शिक्षक ना ! मग मी तुम्हाला उत्तर देणार नाही तुम्हीच शोधा असे बोलून ते पुढे म्हणाले , पाच वर्षांनंतरच्या वयाच्या पाचपटीतून पाच वर्षांपूर्वी असलेल्या वयाची पाचपट वजा केली तर माझे वीस वर्षांपूर्वीचे वय मिळते तर माझे सध्याचे वय किती? थोडी आकडेमोड करून मी त्यांना उत्तर सांगितले तर त्यावर खळखळून हसत त्यांनी दाद देण्यासाठी हात पुढे केला . मित्रांनो, तुम्ही त्यांचे वय सांगू शकाल का?

उत्तराचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील शब्दांवर क्लिक करा.

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२३


➡️  उत्तर :-

चंद्रकांत मर्गज सरांचे वय x वर्षे होते असे मानू.

पाच वर्षांनंतर सरांचे वय = ( x + ५ ) वर्षे

पाच वर्षांपूर्वी सरांचे वय = ( x - ५ ) वर्षे

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

५ ( x + ५ ) - ५ (x - ५) = x - २०

∴ ५x + २५ - ५x + २५ = x - २०

∴ ५० = x - २०

∴ x = ५० + २०

∴ x = ७० वर्षे

➡️ म्हणून चंद्रकांत मर्गज सरांचे वय ७० वर्षे होते.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी


Friday, October 9, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२२

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२२

जगदीशने दहा हजार रुपये चक्रवाढ व्याजाने द. सा. द. शे. ८ दराने दोन वर्षासाठी संदेशला उसने दिले तर मुदत संपल्यानंतर संदेश जगदिशला व्याजासहित किती रक्कम परत करेल?

➡️ शॉर्टकट पद्धतीसाठी खालील शब्दांवर क्लिक करा.

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२२

➡️ उत्तर :- 

मुद्दल = P = ₹ १००००

व्याजदर = R = द. सा. द. शे. ८

मुदत = N = २ वर्षे 

आपल्याला माहिती आहे की,

A = P [ १ + ( R/ १००) ]^N

A = १०००० [ १ + ( ८/१००) ]²

A = १०००० [ (१०० + ८ ) / १०० ]²

A = १०००० [ १०८ / १०० ] ²

A = १०००० × (१०८ / १०० ) × ( १०८ / १०० )

A = १०८ × १०८

A =  ₹ ११६६४

➡️ म्हणून संदेशला ₹ ११६६४ परत करावे लागतील.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी


Wednesday, October 7, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२१

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२१

घराच्या नूतनीकरणाचे काम ८ मजुरांनी काही दिवसात पूर्ण करून द्यायचे कबूल केले. प्रत्यक्ष कामाच्या दिवशी ३ मजूर गैरहजर राहिले त्यामुळे काम पूर्ण होण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस उशीर झाला.  जर सर्व मजूर कामावर हजर झाले असते तर ते काम किती दिवसात पूर्ण झाले असते?

  

 शॉर्टकट पद्धतीसाठी खालील शब्दांवर क्लिक करा.

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२१

➡️ उत्तर :-

सर्व मजूर कामावर हजर झाले असते तर त्यांना ते काम पूर्ण करण्यास x दिवस लागले असते असे मानू.

➡️म्हणून,

८ मजुरांनी केलेले एकूण काम = ८x

परंतु,

प्रत्यक्ष कामाच्या वेळी ३ मजूर गैरहजर राहिले.

➡️म्हणून,

५ मजुरांनी केलेले एकूण काम = ५ (x + ३)

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

८x = ५ ( x + ३ )

∴ ८x = ५x + १५

∴ ८x - ५x = १५

∴ ३x = १५

∴  x = १५/३

∴ x = ५ दिवस.

➡️म्हणून सर्व मजूर कामावर हजर झाले असते तर ते काम ५ दिवसात पूर्ण झाले असते.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी

Friday, October 2, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२०

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२०

जगनने एक मोबाईल खरेदी केला आणि मगनला २०% नफ्याने विकला. मगनने तो मोबाईल छगनला २०% तोट्याने ९६०० रुपयांला विकला तर जगनने तो मोबाईल किती रुपयांला खरेदी केला होता?

शॉर्टकट पद्धतीसाठी खालील शब्दांवर क्लिक करा.

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १२०

➡️ उत्तर :-

जगनने मोबाईल x रुपयांना खरेदी केला असे मानू.

नफा = २०%

➡️ म्हणून,

मोबाईलची विक्री किंमत 

= x + x चे २०%

= x + x × २०/१००

= x + x/५

= ( ५x + x )./५

= ६x/५

➡️ म्हणून,

जगनने मगनला ६x/५ रुपयांना मोबाईल विकला.

तोटा = २०%

➡️ म्हणून,

मोबाईलची विक्री किंमत

= (६x/५) - (६x/५) चे २०%

= (६x/५) - ( ६x/५)(२०/१००)

= (६x/५) - (६x/५)(१/५)

= (६x/५) - (६x/२५)

= (३०x - ६x)/२५

= २४x/२५

➡️ म्हणून,

मगनने छगनला २४x/२५ रुपयांना मोबाईल विकला.

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

२४x/२५ = ९६००

x = ९६०० × २५/२४

x = ४०० × २५

∴ x = १०००० रूपये

➡️ म्हणून जगनने तो मोबाईल १०००० रुपयांना खरेदी केला होता.


©अजित तिजोरे - ८०९७६७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी


Thursday, October 1, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११९

 ✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११९

मुंबईहुन ३०० किमी दूर असलेल्या आपल्या गावी जाण्यासाठी अमित पायी निघाला. ६ किमी प्रतितास या वेगाने काही तास पायी चालल्यानंतर ७० किमी प्रतितास या वेगाने  जाणाऱ्या एका ट्रकच्या चालकाला त्याची दया आली आणि पुढचा सर्व प्रवास अमितने त्या ट्रकमध्ये बसून केला. या संपूर्ण अविश्रांत प्रवासास अमितला एकूण १८ तास लागले तर अमितने एकूण किती अंतर पायी कापले?

शॉर्टकट पद्धतीसाठी खालील शब्दांवर क्लिक करा.


गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११९


➡️ उत्तर :-


अमितने पायी x किमी तर ट्रकने y किमी अंतर कापले असे मानू.

➡️आपल्याला माहिती आहे की,

वेग = अंतर / काळ

➡️ पहिल्या अटीवरून,

x + y = ३००.........(i)

➡️ दुसऱ्या अटीवरून,

(x/६) + (y/७०) = १८

➡️ या समीकरणाला २१० ने गुणून

३५x + ३y = ३७८०.......(ii)

➡️समीकरण (i) ला ३ ने गुणून

३x + ३y = ९००...........(iii)

➡️समीकरण (ii) मधून समीकरण (iii) वजा करू.

   ३५x + ३y = ३७८०

-   ३x + ३y  =    ९००

   (-)  (-)         (-)

--------------------------------

३२x = २८८०

x = २८८० / ३२

x = ९० किमी

➡️ म्हणून अमितने ९० किलोमीटर अंतर पायी कापले.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशी गट्टी



Friday, September 25, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११८

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११८

एक व्यापारी एक घड्याळ ४०० रुपयांस विकून २५% नफा मिळवत असेल तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती?

शॉर्टकट पद्धत पाहण्यासाठी खालील शब्दांवर क्लिक करा.


गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११८


➡️ उत्तर :-

घड्याळाची खरेदी किंमत x रुपये मानू.

नफा = २५%

➡️म्हणून,

घड्याळाची विक्री किंमत

= x + x चे २५%

= x + २५x/१००

= १२५x/१००

= ₹ ५x/ ४

➡️दिलेल्या माहितीनुसार,

५x / ४ = ४००

∴ x = ४०० × ४ / ५

∴ 

x = ८० × ४

x = ₹ ३२०

➡️म्हणून घड्याळाची खरेदी किंमत ३२० रुपये आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशी गट्टी


 

Wednesday, September 23, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११७

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११७

राजेश्वरी आपल्या मासिक पगाराच्या २०% रक्कम घरभाड्यापोटी देते. उरलेल्या पगाराच्या २५% रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी खर्च करते. त्यानंतर उरलेल्या पगाराच्या ८०% रक्कम घरखर्च व इतर खर्चासाठी वापरून तिच्याकडे ३६०० रुपये शिल्लक राहतात तर राजेश्वरीचा पगार काढा.  

शॉर्टकट पद्धतीसाठी खालील शब्दांवर क्लिक करा.


गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११७


➡️ उत्तर :-

राजेश्वरीचा पगार x रुपये आहे असे मानू.

घरभाड्यापोटी द्यावी लागणारी रक्कम 

= x चे २०%

=  x × २०/१००

= x/५

घरभाडे देऊन उरलेली रक्कम 

= x - x/५

= (५x - x) / ५

= ४x/५

➡️ मुलीच्या शिक्षणावर खर्च होणारी रक्कम

= (४x/५) चे २५%

= (४x/५)(२५/१००)

= x/५

मुलीच्या शिक्षणाचा खर्च देऊन उरलेली रक्कम

= (४x/५) - ( x/५)

= ३x/५

➡️ घरखर्च व इतर खर्चासाठी लागणारी रक्कम

= (३x/५) चे ८०%

= (३x/५) ( ८०/१००)

= १२x/२५

ही रक्कम देऊन शिल्लक रक्कम 

= (३x/५) - (१२x/२५)

= (१५x/२५) - (१२x/२५)

= ३x/२५

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

३x/२५ = ३६००

x = ( ३६०० × २५ )/३

x = १२०० × २५

x = ₹ ३०,०००

➡️म्हणून राजेश्वरीचा पगार ३०००० रुपये आहे.




© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी

                         

Friday, September 18, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११६

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११६

शॉर्ट कट उत्तरासाठी खालील शब्दांवर क्लिक करा.

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११६

₹ ४८ किलो किमतीचे तांदूळ ₹ ६० किलो किमतीच्या तांदळामध्ये किती प्रमाणात मिसळावे म्हणजे ते मिश्रण ₹ ५५ किलो विकता येईल?

➡️ उत्तर :-

₹ ४८ चे x किलो तांदूळ ₹ ६० किमतीच्या y किलो तांदळात मिसळले असे मानू.

∴ ₹ ४८ किलोच्या तांदळाची एकूण किंमत = ₹ ४८x

आणि

₹ ६० किलोच्या तांदळाची एकूण किंमत = ₹ ६०y

 उपलब्ध मिश्रण = ( x + y ) किलो

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

५५ (x + y ) = ४८x + ६०y

∴ ५५x + ५५y = ४८x + ६०y

∴ ५५x - ४८x = ६०y - ५५y

∴ ७x = ५ y

∴ x / y = ५ / ७

➡️म्हणून ₹ ४८ रुपये किलोचे तांदूळ ५ : ७ या प्रमाणात मिसळावे लागतील.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी

 

Wednesday, September 16, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११५

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११५

शॉर्टकट पद्धतीसाठी खालील शब्दांवर क्लिक करा.

गणिताशी गट्टी

राजेश नदीच्या प्रवाहाच्या दिशेने ९ किमी प्रतितास आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ५ किमी प्रतितास या वेगाने नाव वल्हवतो तर नदीच्या प्रवाहाचा वेग काढा.

➡️ उत्तर :-

नावेचा संथ पाण्यातील वेग x किमी प्रतितास तर नदीच्या प्रवाहाचा वेग y किमी प्रतितास मानू.

➡️ म्हणून,

नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग = ( x + y ) किमी प्रतितास

नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग = ( x - y ) किमी प्रतितास

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

x + y = ९ .............(i)

x - y = ५ ................(ii)

➡️ समीकरण (i) मधून समीकरण (ii) वजा करू.

       x + y = ९

-      x - y = ५

     (-) (+)  (-)

---------------------------

      २y = ४

∴ y = ४/२

∴ y = २ किमी प्रतितास 

➡️ म्हणून नदीच्या प्रवाहाचा वेग २ किमी प्रतितास आहे.


©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी



Friday, September 11, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र.११४

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११४

संध्याने वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना वाटण्यासाठी १०५ चॉकलेट्स आणली होती. मुले कमी येतील असे वाटून तिने त्यावेळी उपस्थित सर्व मुलांना प्रत्येकी तीन चॉकलेट्स वाटून स्वतः ही तीन चॉकलेट्स घेतली . परंतु  पाचच मिनिटांत आणखी काही मुलांचा घोळका तिला शुभेच्छा देण्यासाठी हजर झाला. गोंधळून न जाता संध्याने फटाफट आकडेमोड करून नंतर आलेल्या सर्व मुलांना प्रत्येकी दोन चॉकलेट्स वाटले. जर तिथे संध्यासहित एकूण ४० मुले असतील तर नंतर आलेला घोळका किती मुलांचा होता?

➡️ उत्तर :-

नंतर आलेली मुले x तर सुरुवातीला असलेली मुले y मानू.

➡️ पहिल्या अटीनुसार,

२x + ३y = १०५.......  (i)

➡️ दुसऱ्या अटीनुसार,

x + y = ४०..........(ii)

∴ ३x + ३y = १२०......(iii) (समी. ii ला ३ ने गुणून)

➡️ समी (iii) मधून समी (ii) वजा करू

   ३x + ३y = १२०

- २x + ३y = १०५

(-)   (-)        (-)

-------------------------

x = १५

➡️ म्हणून नंतर १५ मुले आली होती.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी

Wednesday, September 9, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११३

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११३

मिहीर प्रवाहाच्या दिशेने ५ किमी प्रतितास तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने २ किमी प्रतितास या वेगाने पोहतो तर मिहिरचा संथ पाण्यातील पोहण्याचा वेग किती?

➡️ उत्तर :-

मिहीरचा संथ पाण्यातील पोहण्याचा वेग x किमी प्रतितास तर प्रवाहाचा वेग y किमी प्रतितास मानू.

➡️ आपल्याला माहिती आहे की,

 प्रवाहाच्या दिशेने सापेक्ष वेग = (x + y) किमी प्रतितास

तर,

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सापेक्ष वेग = ( x - y) किमी प्रतितास

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

x + y = ५................(i)

x - y = २................(ii)

➡️ समीकरण (i) व (ii) यांची बेरीज करून,

२x = ७

∴ x = ७/२

∴ x = ३.५ किमी प्रतितास

➡️ म्हणून मिहिरचा संथ पाण्यातील पोहण्याचा वेग ३.५ किमी प्रतितास आहे.




©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी


Friday, September 4, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११२

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११२

हेमंत आपल्या मासिक पगाराच्या ३०% रक्कम घरभाड्यापोटी देतो तर उर्वरित रकमेच्या ८०% रक्कम घरखर्च व इतर सर्व खर्चासाठी वापरतो तर हेमंतकडे पगाराच्या किती टक्के रक्कम शिल्लक राहते?

➡️ उत्तर :-

हेमंतचा मासिक पगार x रुपये आहे असे मानू.

➡️ म्हणून,

घरभाड्यापोटी द्यावी लागणारी रक्कम

=  x चे ३०% 

=  x × ३०/१००

= ₹ ३x/१०

➡️ घरभाडे देऊन उरलेली रक्कम

= x - ३x/१०

= (१०x - ३x)/१०

= ₹ ७x/१०

➡️ घरखर्च व इतर सर्व खर्चासाठी लागलेली रक्कम

= (७x/१०) चे ८०%

= (७x/१०)(८०/१००)

= ₹ ५६x /१००

➡️ बचत = मासिक पगार - मासिक खर्च

बचत = x - [(३x/१०)+ (५६x/१००)]

∴ बचत = x - [ (३०x/१००) + ( ५६x/१००)]

∴ बचत = x - [ (३०x + ५६x) / १००]

∴ बचत = x - [ ८६x/१००]

∴ बचत = (१००x - ८६x)/१००

∴ बचत = ₹ १४x/१००

➡️ म्हणून,

बचतीची टक्केवारी = (बचत / पगार) × १००

∴ बचतीची टक्केवारी = [ (१४x/१००) /x ]× १००

∴ बचतीची टक्केवारी = १४

➡️ म्हणून हेमंतकडे पगाराच्या १४% रक्कम शिल्लक राहते.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी



Wednesday, September 2, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १११

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १११

दोन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेहून २७ ने मोठी आहे. तर त्या संख्येच्या दशकस्थानी कोणता अंक असेल?

➡️ उत्तर :-

दोन अंकी संख्येच्या दशकस्थानाचा अंक x तर एकक स्थानाचा अंक y मानू.

➡️ म्हणून,

ती दोन अंकी संख्या = १०x + y

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

१०x + y = ( x + y) + २७

१०x - x + y - y = २७

९x = २७

x = २७/९

x = ३

➡️ म्हणून त्या दोन अंकी संख्येच्या दशकस्थानाचा अंक ३ आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी

Friday, August 28, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११०

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११०

एका वर्गातील ३० विद्यार्थी आणि वर्गशिक्षक यांच्या वयाची सरासरी १६ वर्षे आहे.  वर्गशिक्षक वगळता वयाची सरासरी १ ने कमी होते. तर वर्गशिक्षकांचे वय किती?

➡️ उत्तर :- 

वर्गशिक्षकांचे वय x वर्षे मानू. 

आपल्याला माहिती आहे की,

सरासरी = सर्व पदांची बेरीज / पदांची एकूण संख्या

➡️ म्हणून,

३० विद्यार्थी आणि वर्गशिक्षक यांच्या वयाची बेरीज 

= ( ३१ × १६

= ४९६ वर्षे ..........(i)

वर्गशिक्षक वगळता मुलांच्या वयाची बेरीज

 = ३० × १५ 

= ४५० वर्षे ......(ii)

➡️ म्हणून,

x = ४९६ - ४५० .....(समीकरण i व ii वरून)

x = ४६ वर्षे

➡️ म्हणून वर्गशिक्षकांचे वय ४६ वर्षे आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी

Wednesday, August 26, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०९

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०९

 कलिकाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय २५ वर्षे होते. आईचे आजचे वय कलिकाच्या आजच्या वयाच्या तिपटीपेक्षा तीन वर्षांनी कमी आहे. तर कलिकाच्या आईचे आताचे वय काढा.

➡️ उत्तर :-

कलिकाचे आजचे वय x वर्ष आहे असे मानू.

➡️ म्हणून,

कलिकाच्या आईचे आताचे वय = (३x - ३ ) वर्षे

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

(३x - ३) - x = २५  

∴ ३x - ३ - x = २५

∴ २x = २५ + ३

∴ २x = २८

∴ x = २८/२

∴ x = १४

➡️ म्हणून,

कलिकाच्या आईचे आताचे वय

= ३x - ३

= ३ × १४ - ३

= ४२ - ३

= ३९

➡️  म्हणून कलिकाच्या आईचे आताचे वय ३९ वर्षे आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०



#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी

Friday, August 21, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०८

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०८

x या संख्येला ५ ने भागले तर बाकी ३ उरते. जर ३x ला ५ नेच भागले तर बाकी किती उरेल?

➡️ उत्तर :-

आपल्याला माहिती आहे की ,

भाज्य = भाजक × भागाकार + बाकी

भागाकार आपण y मानू.

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

x = ५y + ३.........(i)

➡️ म्हणून,

३x = १५y + ९ .........(समी. i ला ३ ने गुणून)

३x = १५y + ५ + ४

३x = ५ ( ३y + १) + ४

➡️भाज्य = भाजक × भागाकार + बाकी या समिकरणाशी तुलना करून

३x ला ५ ने भागल्यावर बाकी ४ उरते.

➡️ म्हणून ३x ला ५ नेच भागले तर बाकी ४ उरेल.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशी गट्टी


Wednesday, August 19, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०७

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.१०७

पीठाच्या गिरणीमध्ये दळण बांधण्यासाठी ०.३५ मीटर सुतळी लागते. तर १५.७५ मीटर लांब असलेल्या सुतळीचे दळण बांधण्यासाठी किती तुकडे तयार होतील?


➡️ उत्तर :-

त्या सुतळीचे दळण बांधण्यासाठी एकूण x तुकडे तयार होतील असे मानू.

सुतळीच्या एका तुकड्याची लांबी = ०.३५ मीटर 

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

x = १५.७५ / ०.३५

x = १५७५/३५

x = ४५ 

➡️ म्हणून त्या सुतळीचे दळण बांधण्यासाठी एकूण ४५ तुकडे होतील.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशी गट्टी

Friday, August 14, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०६

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र.१०६

आज गुरुवार दिनांक १३ ऑगस्ट २०२०. गेल्या वर्षी याच तारखेला  गणिताशी गट्टीचा पहिला प्रश्न विचारला गेला तर त्या तारखेला कोणता वार होता?

➡️ उत्तर :-

सामान्य वर्षात ३६५ दिवस असतात म्हणजे ५२ आठवडे अन एक दिवस.

➡️म्हणून,

सामान्य वर्षांत एक दिवस जादा असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार १ दिवसांनी पुढे जातो अथवा मागील वर्षी त्याच तारखेला वार एक दिवसाने मागे जातो.

लीप वर्षात ३६६ दिवस असतात म्हणजे ५२ आठवडे अन २ दिवस.

➡️म्हणून,

लीप वर्षांत दोन दिवस जादा असल्याने पुढील वर्षी त्याच तारखेला वार २ दिवसांनी पुढे जातो अथवा मागील वर्षी त्याच तारखेला वार २ दिवसांनी मागे जातो.

२०२० हे वर्ष लीप वर्ष आहे.

➡️ म्हणून,

१३ ऑगस्ट २०२० ला गुरुवार आहे. त्यामुळे १३ ऑगस्ट २०१९ रोजी मंगळवार होता.


➡️ म्हणून गणिताशी गट्टीचा पहिला प्रश्न मंगळवारी विचारला गेला.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी



Wednesday, August 12, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०५

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०५

 सकाळी ठीक साडेनऊ ( ९:३०) वाजता मिनीटकाटा आणि तासकाटा दरम्यान किती मापाचा कोन असेल?

➡️ उत्तर :-

बारा तासांत तासकाटा ३६०° फिरतो.

➡️म्हणून,

साडेनऊ म्हणजेच १९/ २ तासात तासकाट्याचा कोन 
= [( ३६०/१२ )(१९/२)]°
= [१५ × १९ ]°
= २८५°

६० मिनिटांत मिनिटकाटा ३६०° फिरतो.

➡️म्हणून,

 अर्ध्या तासात म्हणजेच ३० मिनिटात मिनिटकाट्याचा कोन 
= [( ३६०/६० )(३०)]°
= [६ × ३० ]°
= १८०°

➡️म्हणून,

तासकाटा आणि मिनिटकाटा यांच्या दरम्यानचा कोन
= २८५° - १८०°
= १०५°

➡️म्हणून तासकाटा आणि मिनिटकाटा यांच्या दरम्यान १०५° चा कोन असेल.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०



#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी


Friday, August 7, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०४

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०४


चक्रवाढव्याजाने काही ठराविक रक्कम ६ वर्षात तिप्पट होते तर ती रक्कम चक्रवाढ व्याजानेच नऊपट होण्यास किती वर्षे लागतील?


➡️ उत्तर :-

आपल्याला माहिती आहे की ,

रास = मुद्दल [ १ + ( दर/१००)] ^मुदत

मुद्दल x रुपये मानू.

➡️ म्हणून,

रास = ३x रुपये

➡️ म्हणून,

३x = x[ १ + ( दर/१००)] ^६ 

३ = [ १ + ( दर/१००)] ^६.......(i)

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

९x = x [ १ + ( दर/१००)] ^मुदत

९ = [ १ + ( दर/१००)] ^मुदत

३^२ = [ १ + ( दर/१००)] ^मुदत

{[ १ + ( दर/१००)] ^६ }^२ =  [ १ + ( दर/१००)] ^मुदत ...(i वरून)

[ १ + ( दर/१००)] ^१२ = [ १ + ( दर/१००)] ^मुदत


➡️म्हणून,

मुदत = १२ वर्षे


➡️चक्रवाढ व्याजाने ती रक्कम नऊपट होण्यास १२  वर्षे लागतील.



© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०



#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशी गट्टी

Thursday, August 6, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०३

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०३

एका व्यापाऱ्याने ७० रुपये किलो किमतीच्या २० किलो तांदळाच्या गोणीमध्ये ५५ रुपये किलो किमतीचे तांदूळ मिसळले आणि ते तांदूळ ७२ रुपये किलोने विकून २०% नफा कमावला. तर त्याने ५५ रुपये किलोचे किती किलो तांदूळ त्या गोणीत मिसळले होते?

➡️ उत्तर :- 

५५ रुपये किलोचे x किलो तांदूळ त्या गोणीत मिसळले होते असे मानू.

➡️ म्हणून,

x किलो तांदळाची खरेदी किंमत = ₹ ५५x
२० किलो तांदळाची खरेदी किंमत = २० × ७० = ₹ १४००

➡️ ५५ रुपये किलोचे x किलो तांदूळ त्या गोणीत मिसळल्यानंतर 

१ किलो तांदळाची खरेदी किंमत = (५५x + १४००) / (x + २०)...(i)

गोणीतील तांदूळ ७२ रुपये किलोने विकून २०% नफा मिळवला आहे.

आपल्याला माहिती आहे की,

नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत 

         आणि 

शेकडा नफा = १०० × नफा / खरेदी किंमत 

२० = १००( विक्री किंमत - खरेदी किंमत) / खरेदी किंमत 

२० × खरेदी किंमत = १००(७२ - खरेदी किंमत)

२० × खरेदी किंमत = ७२०० - १०० × खरेदी किंमत

२० × खरेदी किंमत + १०० × खरेदी किंमत = ७२००

१२० × खरेदी किंमत = ७२००

खरेदी किंमत = ७२००/१२०


➡️ म्हणून,


१ किलो तांदळाची किंमत = ₹ ६०.....(ii)

➡️ समीकरण (i) व (ii) वरून

६० = (५५x + १४००)/ (x + २०) 
६०(x + २०) = (५५x + १४००)
६०x + १२०० = ५५x + १४००
६०x - ५५x = १४०० - १२००
५x = २००
x = २००/५
x = ४०
➡️ म्हणून ५५ रुपये किलोचे ४० किलो तांदूळ त्या गोणीत मिसळले होते.



© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी








Friday, July 31, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०२

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०२

सरळव्याजाने १० वर्षात बँकेत गुंतवलेली रक्कम दुप्पट झाली असेल तर त्या बँकेचा द. सा. द. शे. व्याजदर किती?

➡️ उत्तर :-

बँकेचा द. सा. द. शे. दर x  तर गुंतवलेली रक्कम y मानू.

आपल्याला माहिती आहे की,

सरळव्याज = ( म × द × क)/१०० 

 सरळव्याज गुंतविलेल्या रकमेएवढे झाले की रक्कम दुप्पट होते.

➡️ दिलेल्या माहितीनुसार,


y = ( y × x × १०)/१००

➡️ म्हणून,

x = ( १०० × y )/( y × १०)
x = १०

➡️ म्हणून त्या बँकेचा व्याजदर द. सा. द. शे. १० आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Wednesday, July 29, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र.१०१

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १०१

 ४००० मीटर लांबीचा बेर्डेवाडी बोगदा पार करण्यासाठी रेल्वेला किती वेळ लागतो हे पाहण्यासाठी अक्षय बोगद्याबाहेर उभा आहे. त्याच्या निरीक्षणानुसार रेल्वेला बोगदा पार करण्यासाठी ३ मिनिटे ४४ सेकंद लागले आणि त्याला ओलांडण्यासाठी रेल्वेला २४ सेकंद लागले. जर रेल्वे एकसमान वेगाने धावत असेल तर त्या रेल्वेची लांबी किती?

➡️ उत्तर :- 

रेल्वेची लांबी x मीटर आहे असे मानू.
३ मिनिट ४४ सेकंद = (३ × ६० + ४४) सेकंद = २२४ सेकंद

आपल्याला माहिती आहे की,
वेग = अंतर / वेळ

रेल्वे एकसमान वेगाने धावत आहे.

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

x/२४ = (x + ४०००)/२२४
२२४x = २४(x + ४०००)
२२४x = २४x + ९६०००
२२४x - २४x = ९६०००
२००x = ९६०००
x = ९६०००/२००
x = ४८० मीटर.

➡️ म्हणून रेल्वेची लांबी ४८० मीटर आहे.


© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी


Friday, July 24, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १००

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १००

 मराठी शाळा व मराठी भाषा संवर्धन यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानच्या एकूण व्हाट्सअप समूहापैकी एक दशांश समूह हे मराठी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचे आहेत. त्यातून उरलेल्या समूहाच्या एक तृतीयांश समूह जिल्हानिहाय/ विभागनिहाय आहेत. त्यानंतर उर्वरित समूहाच्या एक दशांश समूह आरोग्यविषयक बाबींशी संबंधित आहेत. जेवढे आरोग्यविषयक समूह आहेत त्याच्या दुप्पट समूह प्रशासन आणि नियोजनाशी संबंधित आहेत. विविध क्षेत्र आणि विषयाला समर्पित (जसे की पाककला, गणित, रंगभूमी, संतवाणी वगैरे) असे ४२ समूह आहेत. तर ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे व्हाट्सअपवर एकूण किती समूह आहेत?

➡️ उत्तर :-

ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे एकूण x समूह आहेत असे मानू.

➡️ म्हणून,

मराठी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचे समूह = x/१०

मराठी शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांचे समूह वगळून ज्ञामप्रचे राहिलेले समूह = x - (x/१०) = (१०x - x) / १० = ९x / १०

➡️ म्हणून,

जिल्हा / विभागनिहाय समूह = (१/३)(९x/१०) = ३x/१०

जिल्हा / विभागनिहाय समूह वगळून ज्ञामप्रचे राहिलेले समूह
 = (९x/१०) - (३x/१०) = (९x - ३x) / १० = ६x / १० 

➡️ म्हणून,


आरोग्यविषयक बाबींशी संबंधित समूह = (१/१०)(६x/१०) = ६x/१००
प्रशासन आणि नियोजनाचे समूह = २(६x/१००) = १२x/ १००

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

x = (x/१०) + (३x/१०) + ( ६x/१००) + ( १२x/१००) + ४२
१००x = १०x + ३०x + ६x + १२x + ४२००.......(समीकरणास १०० ने गुणून)
१००x = ५८x + ४२००
१००x - ५८x = ४२००
४२x = ४२००
x = ४२००/४२
x = १००

म्हणून ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठानचे व्हाट्सअपवर एकूण १०० समूह आहेत.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी


Wednesday, July 22, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९९

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९९

मी नेहमीच्या वेगाच्या तीन चतुर्थांश वेगाने चाललो तर मला स्टेशनवर पोहोचण्यास पाच मिनिटे उशीर होतो. तर मला नेहमी स्टेशनला चालत जाण्यासाठी किती वेळ लागतो?

➡️उत्तर :-

स्टेशनला जाण्यासाठी मला नेहमी x मिनिटे लागतात असे मानू.
तर अंतर y किमी मानू.

आपल्याला माहिती आहे की,
वेग = अंतर/ काळ

➡️म्हणून,

माझा नेहमीचा वेग = y/x

जर माझा वेग नेहमीच्या वेगाच्या तीन चतुर्थांश केला तर स्टेशनला जाण्यासाठी मला लागणारा वेळ
= y / (३/४)(y/x)
= ४x/३

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

x + ५ = ४x/३
३(x + ५) = ४x
३x + १५ = ४x
४x - ३x = १५
x = १५ मिनिटे.

म्हणून स्टेशनला चालत जाण्यासाठी मला नेहमी १५ मिनिटे लागतात.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, July 17, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९८

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९८

एक टाकी १८ तासात पूर्ण भरते. परंतु तिच्या तळाशी छिद्र पडल्याने तिला पूर्ण भरण्यासाठी आता ३० तास लागतात. जर ती टाकी पूर्ण भरलेली असेल तर ती रिकामी होण्यासाठी किती तास लागतील?

➡️ उत्तर :-

ती टाकी x तासांत रिकामी होते असे मानू.

➡️ म्हणून,

एका तासात ती टाकी  १/x एवढी रिकामी होते.

छिद्र पडलेले नसताना ती टाकी १८ तासात भरते.

➡️ म्हणून,

ती टाकी एका तासात १/१८ इतकी भरते.

छिद्र पडले म्हणून  ती टाकी आता ३० तासात भरते.

➡️ म्हणून,

ती टाकी एका तासात १/३० इतकी भरते.

टाकी भरण्यातील हा फरक टाकीला झालेल्या त्या छिद्रामुळे पडला आहे.

म्हणजेच , एका तासात ती टाकी [(१/१८)-(१/३०)] इतकी रिकामी होते.

➡️ म्हणून,

(१/x) = (१/१८) - (१/३०)
(१/x) = (५/९०) - (३/९०)
(१/x) = २/९०
१/x = १/४५

➡️ म्हणून,

x = ४५ तास


म्हणून ती टाकी रिकामी होण्यास ४५ तास लागतील.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Wednesday, July 15, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९७

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९७

रमेश आणि हिमेश एक काम १४ दिवसांत पूर्ण करतात. रमेशचा कामाचा वेग  हिमेशच्या निम्माच असेल तर तो (रमेश) तेच काम एकट्याने किती दिवसांत पूर्ण करेल?

➡️ उत्तर :-

रमेश ते काम एकट्याने x दिवसांत पूर्ण करेल असे मानू.

➡️ म्हणून, 

रमेशने एका दिवसात केलेले काम = १/x
हिमेशच्या कामाचा वेग रमेशच्या कामाच्या दुप्पट आहे.

➡️ म्हणून, 

हिमेशने एका दिवसात केलेले काम = २/x

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

(१/x) + (२/x) = १/१४
३/x = १/१४
x = १४×३
x = ४२ दिवस


म्हणून रमेशला एकट्याने ते काम करण्यासाठी ४२ दिवस लागतील.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, July 10, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९६

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९६

अमर, अकबर आणि अँथनी यांना ५६०० रुपये खालील पद्धतीने वाटले आहेत. अमरला अकबरला मिळालेल्या रकमेच्या निम्मी रक्कम दिली आणि अँथनीला अकबराच्या दुप्पट रक्कम देण्यात आली.तर अमर आणि अँथनी यांना मिळालेल्या रकमेतील फरक किती असेल?

➡️ उत्तर :-

अमरला x रुपये मिळाले असे मानू.

➡️ म्हणून,

अकबराला मिळालेली रक्कम = ₹ २x
अँथनीला मिळालेली रक्कम = ₹ ४x

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

x + २x + ४x = ५६००
७x = ५६००
x = ५६००/७
x = ८००

➡️ म्हणून,

अमरला मिळालेली रक्कम = x = ₹ ८००
अकबराला मिळालेली रक्कम = २x = २×८०० = ₹ १६००
अँथनीला मिळालेली रक्कम = ४x = ४×८०० = ₹ ३२००

➡️म्हणून,

अमर आणि अँथनी यांना मिळालेल्या रकमेतील फरक
= ३२०० - ८००
= २४००

म्हणून अमर आणि अँथनी यांना मिळालेल्या रकमेतील फरक 
₹ २४०० आहे.


©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Wednesday, July 8, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९५

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९५

तीन संख्यांची बेरीज १०२ आहे. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर २ : ३ आहे तर दुसऱ्या संख्येचे तिसऱ्या संख्येशी गुणोत्तर ६ : ७ आहे. तर दुसरी संख्या कोणती?

➡️ उत्तर :-

पहिली संख्या : दुसरी संख्या = २ : ३ .....(i)
दुसरी संख्या : तिसरी संख्या = ६ : ७ .....(ii)

➡️ म्हणून,

पहिली संख्या : दुसरी संख्या = १२ : १८.....(i वरून)
दुसरी संख्या : तिसरी संख्या = १८ : २१.....(ii वरून)

➡️ म्हणून,

पहिली संख्या : दुसरी संख्या : तिसरी संख्या = १२ : १८ : २१
समानपट x मानू.

➡️ म्हणून,

पहिली संख्या = १२x
दुसरी संख्या = १८x
तिसरी संख्या = २१x

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

१२x + १८x + २१x = १०२
५१x = १०२
x = १०२/५१
x = २

➡️ म्हणून,

दुसरी संख्या = १८x = १८ × २ = ३६


म्हणून ती दुसरी संख्या ३६ आहे.


©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, July 3, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९४

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९४

नारायण बुक डेपोने २५ डझन वह्या ४५० रुपये डझन प्रमाणे विकत घेतल्या. त्यातील १५ डझन वह्या १०% नफ्याने विकल्या तर उर्वरित वह्या २०% नफ्याने विकल्या तर या संपूर्ण व्यवहारात त्याला किती टक्के नफा झाला?

➡️ उत्तर :-

एक डझन वह्यांची खरेदी किंमत = ₹ ४५०

➡️म्हणून,

२५ डझन वह्यांची खरेदी किंमत = २५ × ४५० = ₹ ११,२५०
१५ डझन वह्यांची खरेदी किंमत = १५ × ४५० = ₹ ६७५०
१०डझन वह्यांची खरेदी किंमत = १० × ४५० = ₹ ४,५००

➡️ १५ डझन वह्यांची खरेदी किंमत ₹१०० मानू
     नफा = १०%

➡️म्हणून,

१५ डझन वह्यांची विक्री किंमत = ₹ ११०

➡️ म्हणून,

१५ डझन वह्यांची विक्री किंमत = (११०/१००)६७५० = ₹ ७४२५

➡️ १० डझन वह्यांची खरेदी किंमत ₹१०० मानू
     नफा = २०%

➡️म्हणून,

१० डझन वह्यांची विक्री किंमत = ₹ १२०

➡️ म्हणून,

१० डझन वह्यांची विक्री किंमत = (१२०/१००)४५०० = ₹ ५४००

➡️ म्हणून,

२५ डझन वह्यांची विक्री किंमत = ७४२५ + ५४०० = ₹ १२,८२५

➡️ नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत 

नफा = १२८२५ - ११२५० = ₹ १,५७५

➡️ शेकडा नफा = (नफा/ खरेदी किंमत) × १००

शेकडा नफा = (१५७५/११२५०) × १००
शेकडा नफा = (६३/४५) × १०
शेकडा नफा = १४


➡️म्हणून या संपूर्ण व्यवहारात नारायण बुक डेपोला १४% नफा झाला.


©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Wednesday, July 1, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९३

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९३

*आचार्यात् ......कालक्रमेण च।।*  या संस्कृत श्लोकानुसार विद्यार्थी एकूण चार मार्गांनी ज्ञान मिळवतो. एकूण ज्ञानापैकी एक चतुर्थांश ज्ञान तो सहाध्यायांकडून मिळवतो. त्यानंतर उर्वरित ज्ञानापैकी एक तृतीयांश ज्ञान अनुभवांतून मिळवतो. त्यानंतर उरलेल्या ज्ञानापैकी निम्मे ज्ञान तो स्वतः च्या बुद्धीने मिळवत असेल तर तो  त्याने मिळवलेल्या एकूण ज्ञानापैकी किती ज्ञान शिक्षकांकडून मिळवतो?

➡️ उत्तर :-

विद्यार्थ्याने मिळवलेले एकूण ज्ञान x मानू.

➡️ सहाध्यायांकडून मिळवलेले ज्ञान = (१/४)x

त्यानंतर उर्वरित ज्ञान = x - (१/४)x = (४x - १x) / ४ = (३/४)x

➡️ विद्यार्थ्याने अनुभवांतून मिळवलेले ज्ञान = (१/३)(३/४)x = (१/४)x

त्यानंतर उर्वरित ज्ञान = (३/४)x - (१/४)x = (२/४)x = (१/२)x

➡️ विद्यार्थ्याने स्वतःच्या बुद्धीने मिळवलेले ज्ञान

 = (१/२)(१/२)x = (१/४)x

➡️ म्हणून,

विद्यार्थ्याने शिक्षकांकडून मिळवलेले ज्ञान
= x - [(१/४)x+(१/४)x+(१/४)x]
= x - [(३/४)x]
= (४x - ३x)/४
= (१/४) x

➡️म्हणून विद्यार्थी शिक्षकांकडून एकूण ज्ञानाच्या एक चतुर्थांश ज्ञान मिळवतो.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, June 26, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९२

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९२

निव्वळ दूध असलेल्या दुधाच्या कॅन मधून ३०% दूध काढून त्यात तितकेच पाणी ओतले. ही क्रिया परत एकदा करण्यात आली असेल तर दुसऱ्यांदा पाणी ओतल्यानंतर कॅन मध्ये निव्वळ दूध किती टक्के असेल?

➡️ उत्तर :- 

कॅन मध्ये १०० लिटर दुध आहे असे मानू.

➡️ पहिल्या क्रियेनंतर कॅनमध्ये उरलेले दूध
= १०० चे ७०% = १०० × ७०/१०० = ७० लिटर

➡️ दुसऱ्या क्रियेनंतर कॅनमध्ये उरलेले दूध
= ७० चे ७०% = ७० × ७०/१०० = ४९ लिटर

➡️ म्हणून दुसऱ्यांदा पाणी ओतल्यानंतर त्या कॅनमध्ये निव्वळ दूध ४९% राहील.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Wednesday, June 24, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९१

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९१

अंजूचे आजचे वय मंजूच्या तीन वर्षांपूर्वीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघींच्या सध्याच्या वयाची बेरीज १९ वर्षे असेल तर अंजूचे आजचे वय काढा.

➡️ उत्तर :-

मंजुचे तीन वर्षांपूर्वीचे वय x वर्षे मानू.

➡️ म्हणून,

अंजूचे आजचे वय = ३x वर्षे

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

३x + (x + ३ ) = १९
४x = १९ - ३
४x = १६
x = १६ / ४
x = ४

➡️ म्हणून,

अंजूचे आजचे वय = ३x = ३ × ४ = १२ वर्षे.

➡️ म्हणून अंजूचे आजचे वय १२ वर्षे आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, June 19, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९०

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ९०

सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल आणि कोरपडीचा रस यांचे प्रमाण २:१ आहे. त्यात ४ लिटर कोरपडीचा रस मिसळल्याने ते प्रमाण २:३ झाले तर त्या सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल किती लिटर होते? 

➡️ उत्तर :-

अल्कोहोल व कोरपडीचा रस यांचे सुरुवातीचे प्रमाण = २ : १
समानपट x मानू.

➡️ म्हणून,

अल्कोहोल = २x लिटर
कोरपडीचा रस = १x लिटर

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

२x/(१x + ४) = २ : ३
x/(x+४) = १ : ३
३x = x + ४
३x - x = ४
२x = ४
x = ४/२
x = २

➡️ म्हणून,

अल्कोहोल = २x = २ × २ = ४ लिटर.

➡️म्हणून त्या सॅनिटायझर मध्ये ४ लिटर अल्कोहोल होते.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०



#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Wednesday, June 17, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८९

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८९

एका फळविक्रेत्याला साडेतीन डझन केळी विकल्यानंतर ८ केळीच्या विक्री किमतीएवढा तोटा होतो. तर शेकडा तोटा काढा.

➡️ उत्तर :-

साडेतीन डझन केळी = ३.५ × १२ = ४२ केळी

तोटा = खरेदी किंमत - विक्री किंमत

४२ केळ्यांची खरेदी किंमत - ४२ केळ्यांची विक्री किंमत = ८ केळ्यांची विक्री किंमत

४२ केळ्यांची खरेदी किंमत = ४२ केळ्यांची विक्री किंमत + ८ केळ्यांची विक्री किंमत 

४२ केळ्यांची खरेदी किंमत = ५० केळ्यांची विक्री किंमत .....(i)

एका केळ्याची खरेदी किंमत x रुपये मानू.

➡️ म्हणून,

५० केळ्यांची खरेदी किंमत = ५० x रुपये
५० केळ्यांची विक्री किंमत = ४२x रुपये ....(समी i वरून)

➡️ म्हणून,

शेकडा तोटा = (तोटा / खरेदी किंमत )× १००
शेकडा तोटा = [(५०x - ४२x)/५०x] × १००
शेकडा तोटा = [ ८x / ५०x ] × १००
शेकडा तोटा = १६

➡️म्हणून त्या फळविक्रेत्याला शेकडा तोटा १६ झाला.




©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०



#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी



Friday, June 12, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८८

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८८ 

एक हौद ५/८ भरलेला आहे. १५ लिटर क्षमतेच्या ५ बादल्या त्यात ओतल्यावर तो ३/४ भरतो तर त्या हौदाची क्षमता किती लिटर आहे?

➡️ उत्तर :- 

हौदाची क्षमता x लिटर आहे असे मानू.

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

(५/८)x + ५ बादल्या = (३/४)x
५ बादल्या = (३/४)x - (५/८)x
५ बादल्या = (६/८)x - (५/८)x
५ बादल्या = (१/८)x

➡️ म्हणून,

x = ८ × ५ बादल्या
x = ४० बादल्या
x = ४० × १५ लिटर
x = ६०० लिटर

➡️ म्हणून त्या हौदाची क्षमता ६०० लिटर आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Wednesday, June 10, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८७

 ✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८७

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व शिक्षण विकास मंच यांच्या वतीने ८ जून रोजी शालेय शिक्षणातील बदलत्या भूमिका या विषयावर शिक्षणकट्टा वेबिनार आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून ११००० तर झूमवरून १०० सदस्यांनी भाग घेतला. या कट्टयात श्रीम. धनवंती हर्डीकर, श्री. किशोर दरक , श्रीम. प्रीती कामत तेलंग, श्रीम. शुभदा चौकर, श्री. मिलिंद चिंदरकर, श्री. दत्तात्रय वारे या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. सर्व तज्ज्ञांच्या सादरीकरणाचा सरासरी वेळ ३० मिनिटे होता. प्रीतीताई वगळता इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सादरीकरणाचा सरासरी वेळ २९ मिनिटे असेल तर प्रीतीताईंनी या कार्यक्रमात सादरीकरणासाठी किती वेळ घेतला?

➡️ उत्तर :-

सहा तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सादरीकरणाचा सरासरी वेळ = ३० मिनिटे

➡️म्हणून,

सहा तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सादरीकरणाचा एकूण वेळ = ३० × ६ = १८० मिनिटे.

प्रीतीताई वगळता इतर तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सादरीकरणाचा सरासरी वेळ = २९ मिनिटे

➡️म्हणून,

पाच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सादरीकरणाचा एकूण वेळ = २९ × ५ = १४५ मिनिटे.

➡️ म्हणून,

प्रीतीताईच्या सादरीकरणाचा वेळ = १८० - १४५ = ३५ मिनिटे.

➡️ म्हणून प्रीतीताईना सादरीकरणासाठी ३५ मिनिटे लागली.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०



#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, June 5, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८६

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८६

दोन वर्षांपूर्वी प्लूटो आणि नेपच्या यांच्या वयाचे गुणोत्तर ३ : २ होते. आजपासून चार वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ५ : ४ झाले असते तर प्लूटो आणि नेपच्या यांच्या वयातील अंतर किती?

➡️ उत्तर :-

प्लूटोचे आजचे वय x वर्षे तर नेपच्याचे y वर्षे मानू.

➡️ दोन वर्षांपूर्वी,

प्लूटोचे वय = ( x - २ ) वर्षे
नेपच्याचे वय = ( y - २ ) वर्षे

➡️ चार वर्षानंतर,

प्लूटोचे वय = ( x + ४ ) वर्षे
नेपच्याचे वय = ( y + ४ ) वर्षे

➡️ पहिल्या अटीनुसार,

( x - २) / ( y - २ ) = ३/२
२( x - २ ) = ३( y - २ )
२x - ४ = ३y - ६
२x - ३y = - ६ + ४
२x - ३y = -२ .......(i)

➡️ दुसऱ्या अटीनुसार,

( x + ४ ) / ( y + ४ ) = ५/४
४( x + ४ ) = ५( y + ४ )
४x + १६ = ५y + २०
४x - ५y = २० - १६
४x - ५y = ४ .........(ii)

➡️ समीकरण(i) ला २ ने गुणून,

४x - ६y = -४ .......(iii)

➡️ समीकरण(ii) मधून समीकरण(iii) वजा करून,

   ४x - ५y = ४
-  ४x - ६y = -४
 (-)   (+)    (+)
_______________
y = ८

➡️ y = ८ ही किंमत समीकरण (i) मध्ये ठेवून,

२x - ३(८) = -२
२x - २४ = -२
२x = -२ + २४
२x = २२
x = २२/२
x = ११

➡️ म्हणून,

प्लूटो आणि नेपच्या यांच्या वयातील फरक = x - y = ११ - ८ = ३ वर्षे

➡️ म्हणून त्यांच्या वयातील फरक ३ वर्षे आहे.




©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी


Wednesday, June 3, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८५

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८५

तीन संख्यांपैकी पहिल्या दोन संख्यांची बेरीज ३५ आहे. दुसऱ्या व तिसऱ्या संख्येची बेरीज ४५ आहे तर पहिल्या संख्येची चौपट दुसऱ्या संख्येच्या तिपटीएवढी आहे तर पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज किती?

➡️ उत्तर :-

त्या तीन संख्या x , y आणि z आहेत असे मानू.

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

x + y = ३५ ........(i)
y + z = ४५ .........(ii)
आणि,
४x = ३y

➡️ म्हणून,

y = ४x/३ ........(iii)

➡️ समीकरण (i) व (iii) वरून,

x + ४x/३ = ३५
३x + ४x = १०५ .....(समिकरणास ३ ने गुणून)
७x = १०५
x = १०५/७
x = १५

➡️ x = १५ ही किंमत समीकरण(i) मध्ये ठेवून,

१५ + y = ३५
y = ३५ - १५
y = २०

➡️  y = २० ही किंमत समीकरण(ii) मध्ये ठेवून,

२० + z = ४५
z = ४५ - २०
z = २५

➡️ म्हणून,

पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज = x + z = १५ + २५ = ४०

म्हणून पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज ४० आहे.




©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०



#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, May 29, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८४

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८४

एक डझन देवगड हापूस आंब्याच्या पेटीतून २४० ग्रॅम वजनाचा आंबा काढून त्यात नवीन आंबा टाकला असता पेटीतील आंब्याचे  सरासरी वजन ५ ग्रॅम ने वाढते तर नवीन आंब्याचे वजन किती?

➡️ उत्तर :-

एक डझन आंब्याचे सरासरी वजन x ग्रॅम तर नवीन आंब्याचे वजन y ग्रॅम मानू.

➡️  म्हणून,

एक डझन आंब्याचे एकूण वजन = १२x ग्रॅम
काढलेल्या आंब्याचे वजन = २४० ग्रॅम तर नवीन आंब्याचे वजन y ग्रॅम

➡️ म्हणून,

नवीन एक डझन आंब्याचे वजन = (१२x - २४०) + y ग्रॅम.

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

१२x - २४० + y - १२x = ६०
y = ६० + २४०
y = ३०० ग्रॅम

म्हणून नवीन आंब्याचे वजन ३०० ग्रॅम आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Wednesday, May 27, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८३

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८३

लेफ्टनंट जनरल यांनी आपल्या ३०००० सैनिकांना परेडसाठी मैदानात उभे केले. त्यासाठी त्यांनी एका रांगेत जेवढे सैनिक उभे आहेत तेवढ्याच रांगा करण्याचे ठरविले. सैनिकांना तसे उभे केल्यानंतर काही सैनिक शिल्लक राहिल्याचे त्यांना आढळून आले तर लेफ्टनंट जनरल वगळता किती सैनिक शिल्लक राहिले?

➡️ उत्तर :-

दिलेल्या माहितीनुसार,
 परेडसाठी उभ्या केलेल्या सैनिकांची संख्या ही पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे.
३०,००० पेक्षा लहान असलेली सर्वात मोठी पूर्ण वर्ग संख्या २९,९२९
 ( १७३ × १७३ ) आहे.
➡️ म्हणून,

शिल्लक राहिलेल्या सैनिकांची संख्या
= ३०,००० - २९,९२९
= ७१

➡️ म्हणून ७१ सैनिक शिल्लक राहिले.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०



#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, May 22, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८२

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८२

एका पेन्सिलचा दोन पंचमांश (२/५) भाग काळ्या रंगाने तर उर्वरित भागाच्या एक तृतीयांश (१/३) भाग निळ्या रंगाने रंगविलेला आहे. बाकी उरलेला ३.२ सेमी भाग पांढऱ्या रंगाने रंगवला असेल तर पेन्सिलची एकूण लांबी किती?

➡️ उत्तर :-

पेन्सिलची एकूण लांबी x सेमी आहे असे मानू.

काळ्या रंगाने रंगविलेला भाग = (२/५)x सेमी.
निळ्या रंगाने रंगविलेला भाग = (१/३) [ x - (२/५)x]
निळ्या रंगाने रंगविलेला भाग = (१/३) [ (५x - २x) /५]
निळ्या रंगाने रंगविलेला भाग = (१/३) [३x/५]
निळ्या रंगाने रंगविलेला भाग = x/५ सेमी
पांढऱ्या रंगाने रंगविलेला भाग = ३.२ सेमी

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

(२x/५) + (x/५) + ३.२ = x
(३x/५) + ३.२ = x
x - (३x/५) = ३.२
(५x-३x)/५ = ३.२
२x = ३.२ × ५
x = १६/२
x = ८ सेमी

➡️ म्हणून पेन्सिलची एकूण लांबी ८ सेमी आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी


Wednesday, May 20, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८१

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८१

कमला आणि विमला १०० मीटर शर्यत लावतात. कमलाचा वेग १५ किमी प्रतितास आहे. ती (कमला)  विमला १५ मीटर पुढे गेल्यानंतर धावायला सुरुवात करते तरी विमलाला १० सेकंदाने हरवते तर विमलाचा वेग किती?

➡️ उत्तर :-

आपल्याला माहिती आहे की,

वेग = अंतर / वेळ

कमलाचा वेग १५ किमी प्रतितास आहे.
१५ किमी प्रतितास = १५ × १०००/ (६० ×६०) मीटर / सेकंद
१५ किमी प्रतितास = १५ × ५/१८ मी/से
१५ किमी प्रतितास = ७५ / १८ मी/ से

➡️ म्हणून,

१०० मीटर शर्यत पूर्ण करण्यासाठी कमलाला लागलेला वेळ
= १००/(७५/१८) सेकंद
= ४ × १८/३ सेकंद
= २४ सेकंद

कमला विमलाला १० सेकंदाने हरवते शिवाय विमला१५ मीटर पुढे गेल्यावर धावायला सुरुवात करते.

➡️ म्हणजेच,

विमलाला ८५ मीटर धावण्यासाठी २४ + १० = ३४ सेकंद लागतात.

➡️ म्हणून,

विमलाचा वेग = ८५ / ३४ मीटर प्रति सेकंद
विमलाचा वेग =  ( ८५/३४) ( ६०×६०/१०००) किमी प्रतितास
विमलाचा वेग = (८५/३४) (१८/५) किमी प्रतितास
विमलाचा वेग =  ९ किमी प्रतितास

➡️ म्हणून विमलाचा धावण्याचा वेग ९ किमी प्रतितास आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी



Friday, May 15, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८०

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८०

रमेशने सुरेशकडून सरळव्याजाने द. सा. द. शे. १० दराने २ वर्षासाठी ₹ ५०,००० कर्जाने घेतले व ताबडतोब रमेशने ती सर्व रक्कम राकेशला चक्रवाढव्याजाने द.सा.द.शे. १० दराने २ वर्षांसाठी कर्जाने दिले. या संपूर्ण व्यवहारात त्याला किती रुपयांचा फायदा होईल?

➡️ उत्तर:-

मुद्दल ( म ) = ₹ ५००००
व्याजदर ( द ) = द. सा. द. शे. १०
मुदत ( क ) = २ वर्षे

➡️ सरळव्याज = म × द × क / १००
सरळव्याज = ५०००० × १० × २ / १००
सरळव्याज = ५०० × २०
सरळव्याज = ₹ १०००० ......( i )

➡️ चक्रवाढ व्याज = रास - मुद्दल
चक्रवाढ व्याज = म ( १ + द/१००)^क - म
चक्रवाढ व्याज = म [ (१ + द/१००)^क - १]
चक्रवाढ व्याज = ५०००० [ (१ + १०/१००)^२ - १]
चक्रवाढ व्याज = ५०००० [ (१ + १/१०)^२ - १]
चक्रवाढ व्याज = ५०००० [ (१ + ०.१)^२ - १]
चक्रवाढ व्याज = ५०००० [ (१.१)^२ - १]
चक्रवाढ व्याज = ५०००० [ १.२१ - १]
चक्रवाढ व्याज = ५०००० × ०.२१
चक्रवाढ व्याज = ₹ १०५०० .......(ii)

➡️ म्हणून,

या संपूर्ण व्यवहारात रमेशचा फायदा
= १०५०० - १०००० ....(i व ii वरून)
= ₹ ५००

➡️ म्हणून या संपूर्ण व्यवहारात रमेशला ५०० रुपयांचा फायदा झाला.



© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी 

Wednesday, May 13, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७९

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७९

रमेशने सुरेशकडून सरळव्याजाने द. सा. द. शे. १२ दराने तीन वर्षासाठी ₹ ८५,००० कर्जाने घेतले. त्यात आपल्याजवळची काही रक्कम टाकून रमेशने ती सर्व रक्कम त्याच दिवशी राकेशला सरळव्याजाने द.सा.द.शे. १४ दराने तीन वर्षांसाठी कर्जाने दिले. या संपूर्ण व्यवहारात त्याला ₹ ९३०० मिळाले तर त्याने स्वतःजवळील किती रक्कम टाकली होती?

➡️ उत्तर :-

रमेशने x रुपये टाकले होते असे मानू.

आपल्याला माहिती आहे की,

सरळव्याज = मुद्दल (म) × व्याजदर (द) × मुदत (क)/१००

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

[( ८५००० + x ) × १४ × ३]/१०० - [८५०००× १२ × ३]/१०० =९३००
[( ८५००० + x ) × १४ × ३] - [८५०००× १२ × ३] =९३०० × १००
[( ८५००० + x ) × ४२ ] - [८५०००× ३६] = ९३००००
८५०००×४२ + ४२x - ८५०००×३६ = ९३००००
४२x + ८५०००( ४२ - ३६ ) = ९३००००
४२x + ८५००० × ६ = ९३००००
४२x + ५१०००० = ९३००००
४२x = ९३०००० - ५१००००
४२x = ४२००००
x = ४२००००/४२
x = ₹ १००००

➡️म्हणून रमेशने त्यात १०००० रुपयांची भर घातली होती.




© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, May 8, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७८

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७८

₹ ४५ लिटर किमतीचे दूध ₹४० लिटरने विकण्यासाठी त्यात पाणी किती प्रमाणात मिसळावे?

➡️ उत्तर :- 

दुधात x लिटर पाणी मिसळावे लागेल असे मानू.

१ लिटर दुधाची किंमत = ₹ ४५

x लिटर पाणी मिसळून तयार झालेल्या मिश्रणाची किंमत = ₹ ४०(१+x)

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

४० ( १ + x ) = ४५
४० + ४०x = ४५
४०x = ४५ - ४०
४०x = ५
x = ५/४०
x = १/८ लिटर

➡️ म्हणून,

पाणी : दूध = १/८ : १
पाणी : दुध = १:८

म्हणून पाणी दुधात १:८ या प्रमाणात मिसळावे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Wednesday, May 6, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७७

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७७

३ किमी प्रतितास वेग असलेल्या नदीत प्रवाहाच्या दिशेने १८ किमी जाऊन परत मूळ ठिकाणी येण्यासाठी एका बोटीस १ तास २१ मिनिटे लागतात. तर त्या बोटीचा संथ पाण्यातील वेग किती?

➡️ उत्तर :-

 बोटीचा संथ पाण्यातील वेग x किमी प्रतितास आहे असे मानू.
प्रवाहाच्या दिशेने बोटीचा सापेक्ष वेग = ( x + ३ ) किमी प्रतितास
प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोटीचा सापेक्ष वेग = ( x - ३ ) किमी प्रतितास

आपल्याला माहिती आहे की,

वेग = अंतर / वेळ

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

[१८/(x+३)] + [ १८/(x-३)] = १ तास २१ मिनिटे
१८ [ १/(x+३) + १/(x-३) ] = ८१/६०
(x - ३ + x + ३)/(x+३)(x-३) = ८१/(६० × १८)
२x/(x^२ - ९) = ३/४०
४०×२x = ३ × ( x^२ - ९)
८०x = ३x^२ - २७
३x^२ - ४x - २७ = ०
३x^२ - ८१x + x - २७ = ०
३x(x-२७) + १(x-२७) =०
(x-२७)(३x+१)=०

➡️म्हणून,

(x - २७) = ० किंवा (३x+१) =०
x = २७ किंवा x = -१/३

वेग ऋण नसतो.

➡️ म्हणून,

x = २७ किमी प्रतितास

➡️ म्हणून बोटीचा संथ पाण्यातील वेग २७ किमी प्रतितास आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०



#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, May 1, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७६

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७६

४०० मीटर व ३५० मीटर लांबीच्या दोन रेल्वे समांतर रेल्वे ट्रॅकवर अनुक्रमे ६० किमी प्रतितास व ६५ किमी प्रतितास या वेगाने जात आहेत. जर दोन्ही रेल्वे एकाच दिशेने धावत असतील तर त्या एकमेकींना किती वेळात ओलांडतील?

➡️ उत्तर :-

दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात आहेत.
म्हणून,
सापेक्ष वेग = ६५ - ६० = ५ किमी प्रतितास = ५ × ५/१८ मी/सेकंद = २५/१८ मी/ सेकंद

दोन्ही रेल्वेंना एकमेकींना ओलांडण्यास कापावे लागणारे एकूण अंतर = ४०० + ३५० = ७५० मीटर

➡️ आपल्याला माहिती आहे की ,

वेग = अंतर / वेळ

➡️म्हणून,

वेळ = अंतर / वेग
वेळ = ७५० / (२५/१८) सेकंद
वेळ = ७५० × १८/२५
वेळ = ३० × १८ सेकंद
वेळ = ३० × १८ / ६० मिनिट
वेळ = ९ मिनिट

त्या रेल्वे एकमेकींना ९ मिनिटात ओलांडतील.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Wednesday, April 29, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७५

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७५ 

काही ठराविक अंतर सागर ३ किमी प्रतितास या वेगाने ३ तास ४० मिनिटांत चालून पार करतो. जर तो चालण्याऐवजी १५ किमी प्रतितास या वेगाने पळत गेला तर ते अंतर कापण्यास त्याला किती वेळ लागेल?

➡️ उत्तर :-

आपल्याला माहिती आहे की,

वेग = अंतर / वेळ

➡️ म्हणून,

अंतर = वेग × वेळ

३ तास ४० मिनिटे = (३ + २/३) तास = ११/३ तास

सागर ने पायी कापलेले अंतर = ३ × ११/३ किमी
सागर ने पायी कापलेले अंतर =११ किमी 

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

वेळ = अंतर / वेग
वेळ = ११/ १५ तास
वेळ = (११/१५) × ६० मिनिटे
वेळ = ४४ मिनिटे

सागरला ते अंतर कापण्यास ४४ मिनिटे लागतील.




©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Friday, April 24, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७४

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७४

७ माणसे एका शेतातील पीककापणी ९ दिवसात पूर्ण करतात. तर त्याच शेतात ९ माणसांनी पीककापणी किती दिवसात पूर्ण केली असती?

➡️उत्तर :- 

९ माणसांना पीककापणी करण्यास x दिवस लागतील असे मानू.

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

९ × x = ७ × ९
x = ७

➡️ म्हणून ९ माणसांना पीककापणी करण्यास ७ दिवस लागतील.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

Wednesday, April 22, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७३

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७३

योगेश, मंगेश आणि संदेश या तिघांनी भागीदारीत एक व्यवसाय सुरू केला. योगेशच्या भांडवलाची तिप्पट मंगेशच्या भांडवलाच्या दुप्पट आहे. मंगेशचे भांडवल संदेश च्या भांडवलाच्या तिप्पट आहे. जर त्या व्यवसायात त्यांना ₹१,८०,००० नफा झाला असेल तर त्यात योगेशचा वाटा किती?

➡️ उत्तर :- 

संदेश चा नफ्यातील वाटा ₹ x मानू.
मंगेशचा वाटा = ₹ ३x ........(i)
३× योगेशचा वाटा = २ × मंगेशचा वाटा
३× योगेशचा वाटा = २ × ३x ......(i वरून)
योगेशचा वाटा = २ × ३x / ३

➡️ म्हणून,

योगेशचा वाटा = ₹ २x 

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

२x + ३x + x = १८००००
६x = १८००००
x = १८००००/६
x = ₹ ३०,०००

➡️ म्हणून,

योगेशचा वाटा = २x
योगेशचा वाटा = २ × ३००००
योगेशचा वाटा = ₹ ६०, ०००

➡️ म्हणून त्या नफ्यात योगेशचा वाटा ₹ ६०,००० आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी



Friday, April 17, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७२

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७२

एका भांड्यात दूध आणि पाणी ७ : २ या प्रमाणात मिसळलेले आहे. त्या भांड्यात अजून पाच लिटर पाणी ओतले तर दूध आणि पाणी यांचे प्रमाण ७ : ३ होते तर त्या भांड्यात निव्वळ दूध किती लिटर आहे?

➡️ उत्तर :-

सुरुवातीला दूध व पाणी यांचे प्रमाण = ७:२
समानपट x मानू.
➡️ म्हणून,

सुरुवातीस,
दूध = ७x लिटर
पाणी = २x लिटर

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

७x /( २x + ५ ) = ७/३
x /( २x + ५ ) = १/३
३x = २x + ५
३x - २x = ५
x = ५

➡️ म्हणून,

भांड्यात असणारे निव्वळ दूध
= ७x
= ७ × ५
= ३५ लिटर

➡️ भांड्यात निव्वळ दूध ३५ लिटर आहे.


©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी