✍️ गणिताशी गट्टी क्र - ८
✍️ एक मांजर १२ फूट खोली असलेल्या कोरड्या विहिरीत
पडली. वर येण्यासाठी ती धडपड करू लागली. उडी मारली की तीन फूट वर जायची अन दोन फूट खाली घसरायची. तर विहिरीबाहेर पडण्यासाठी तिला किमान किती उड्या माराव्या लागतील?
▶️ मांजर तीन फूट वर जाते व दोन फूट खाली घसरते.
म्हणजेच एका उडीत ती एक फूट वर चढते.
नऊ उड्या मारल्यावर ती नऊ फूट उंचीवर पोहोचलेली असेल.
▶️विहिरीची खोली १२ फूट आहे.
म्हणजे ती दहावी उडी मारेल तव्हा ती विहिरीच्या काठावर पोहोचलेली असेल.
▶️म्हणून विहिरीबाहेर पडण्यासाठी तिला किमान दहा उड्या माराव्या लागतील.
©अजित तिजोरे-८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी
सर विहीर कोरडी आहे,तिला पायऱ्या नाही आहे....किती पण मोठी उडी घेतल्यावर ती तळालाच पडणार आहे
ReplyDeleteपायऱ्या नाहीत हे खरेच आहे. पण कितीही मोठी उडी घेतली तरी ती तळालाच पडणार आहे हे कळले नाही.
ReplyDeleteती विहिरीच्या कडेने वर चढत आहे असे अपेक्षित आहे. कडा मातीच्याच आहेत. त्यामुळं तीन फूट उडी मारल्यावर ती दोन फूट खाली घसरते आहे.