✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११९
मुंबईहुन ३०० किमी दूर असलेल्या आपल्या गावी जाण्यासाठी अमित पायी निघाला. ६ किमी प्रतितास या वेगाने काही तास पायी चालल्यानंतर ७० किमी प्रतितास या वेगाने जाणाऱ्या एका ट्रकच्या चालकाला त्याची दया आली आणि पुढचा सर्व प्रवास अमितने त्या ट्रकमध्ये बसून केला. या संपूर्ण अविश्रांत प्रवासास अमितला एकूण १८ तास लागले तर अमितने एकूण किती अंतर पायी कापले?
शॉर्टकट पद्धतीसाठी खालील शब्दांवर क्लिक करा.
➡️ उत्तर :-
अमितने पायी x किमी तर ट्रकने y किमी अंतर कापले असे मानू.
➡️आपल्याला माहिती आहे की,
वेग = अंतर / काळ
➡️ पहिल्या अटीवरून,
x + y = ३००.........(i)
➡️ दुसऱ्या अटीवरून,
(x/६) + (y/७०) = १८
➡️ या समीकरणाला २१० ने गुणून
३५x + ३y = ३७८०.......(ii)
➡️समीकरण (i) ला ३ ने गुणून
३x + ३y = ९००...........(iii)
➡️समीकरण (ii) मधून समीकरण (iii) वजा करू.
३५x + ३y = ३७८०
- ३x + ३y = ९००
(-) (-) (-)
--------------------------------
३२x = २८८०
x = २८८० / ३२
x = ९० किमी
➡️ म्हणून अमितने ९० किलोमीटर अंतर पायी कापले.
©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी
सर whatsup group ला ऍड करा तुमच्या
ReplyDelete7507569325
नाव सांगा.
ReplyDelete