Tuesday, August 13, 2019

गणिताशी गट्टी-क्र.१

✍️गणिताशी गट्टी-क्र.१✍️

✍️ पाच वर्षांपूर्वी गौरीचे वय गौरांशच्या वयाच्या पाचपट होते. पाच वर्षानंतर गौरीचे वय गौरांशच्या वयाच्या तिपटीपेक्षा ८ वर्षांनी कमी होते. तर गौरीचे आजचे वय काढा.

➡️ समजा पाच वर्षांपूर्वी गौरांश चे वय x वर्षे होते असे मानू.

म्हणून गौरीचे त्यावेळचे वय = ५x वर्षे
गौरांशचे आजचे वय = (x+५) वर्षे
तर गौरीचे आजचे वय =(५x+५) वर्षे
पाच वर्षानंतर,
गौरांश चे वय = (x+१०) वर्षे
गौरीचे वय = (५x+१०) वर्षे.

➡️दिलेल्या अटीवरून,
५x+१० = ३(x+१०) - ८
५x + १० = ३x+ ३० -८
५x - ३x = ३० - ८ - १०
२x = १२
x = ६

➡️म्हणून गौरीचे आजचे वय
= ५x + ५
= ५×६+५
=३०+५
=३५ वर्षे

©अजित तिजोरे.
8097617020

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

39 comments:

  1. समजा गाैरीचे आजचे वय x वर्षे मानू
    म्हणून 5वर्षापुर्वीचे गाैरीचे वय =(x-5)वर्षे
    म्हणून गाैरांशचे 5वर्षापुर्वीचे वय =( x -5)/5
    दिलेल्या अटीनूसार,
    x +5=3[(x-5)/5+10]-8
    x +13=3(x+45)/5
    5x+65=3x+135
    2x=70
    x=35वर्ष
    म्हनून गाैरीचे आजचे वय 35वर्षे आहे.

    ReplyDelete
  2. सर्वांसाठी उपयुक्त

    ReplyDelete
  3. सॉल्व्ह करण्याची मेथड & स्पष्टीकरण & सादरीकरण मार्मिक आहें.
    🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

    ReplyDelete
  4. All known method.nothing is new.

    ReplyDelete
  5. प्रत्येक प्रश्न व त्यांच्या उत्तराचे स्पष्टीकरण अतिशय योग्य.... आपल्या उपक्रमास खुप खुप शुभेच्छा 🌷🌷🌷

    ReplyDelete
  6. एकदम परिपुर्ण उत्तर

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. समजा गाैरीचे आजचे वय x वर्षे मानू
    म्हणून 5वर्षापुर्वीचे गाैरीचे वय =(x-5)वर्षे
    म्हणून गाैरांशचे 5वर्षापुर्वीचे वय =( x -5)/5
    दिलेल्या अटीनूसार,
    x +5=3[(x-5)/5+10]-8
    x +13=3(x+45)/5
    5x+65=3x+135
    2x=70
    x=35वर्ष
    म्हनून गाैरीचे आजचे वय 35वर्षे आहे.

    ReplyDelete