Wednesday, December 4, 2019

गणिताशी गट्टी-क्र.३३

✍️गणिताशी गट्टी-क्र.३३

एक मनुष्य १४ किमी प्रतितास या वेगाने दिल्लीहून झाशीच्या दिशेने रेल्वेमार्गालगत धावत आहे त्याच दिशेने जाणारी ४०० मीटर लांबीची गतिमान एक्सप्रेस त्याला १० सेकंदात ओलांडते तर गतिमान एक्सप्रेसचा वेग किती असेल?

➡️ समजा गतिमान एक्सप्रेसचा वेग x किमी प्रतितास आहे.

म्हणून गतिमान एक्सप्रेसचा मनुष्य सापेक्ष वेग = ( x - १४ ) किमी प्रति तास

➡️ वेग = अंतर / काळ हे सूत्र आपणास माहिती आहेच.

दिलेल्या अटीवरून,

( x - १४) = ४०० मीटर/१० सेकंद
( x - १४ ) = (४००/१०००)/(१०/३६००) किमी प्रतितास
x - १४ = (४००/१०००)(३६००/१०)
x - १४ =  ४ × ३६
x - १४ = १४४
x = १४४ + १४
➡️ x = १५८ किमी प्रतितास

➡️ म्हणून गतिमान एक्सप्रेसचा वेग १५८ किमी प्रतितास आहे.

© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

1 comment:

  1. एकमान पद्धत वापरून उकल :
    या उदाहरणात उत्तर किमी प्रति तास असे हवे आहे. म्हणून दिलेल्या संख्या किमी वा तासामध्ये रूपांतरित करू या.
    ४०० मीटर = ०.४ किमी.
    १० सेकंद = १/३६० तास.
    तो मनुष्य १४ किमी/तास या वेगाने १/३६० तासात १४/३६० किमी इतके अंतर कापेल.
    गतिमान एक्स्प्रेस व तो मनुष्य एकाच दिशेने जात असल्यामुळे त्या माणसाला ओलांडण्यासाठी गतिमानला कापावे लागणारे अंतर :
    ०.४ + १४/३६०.
    हे अतर गतिमान १/३६० तासात कापते. म्हणून तिचा वेग :
    ( ०.४ + १४/३६०) × ३६०
    = १४४ + १४
    = १५८.
    म्हणून गतिमानचा वेग १५८ किमी/तास हे उत्तर.

    ReplyDelete