Wednesday, December 18, 2019

गणिताशी गट्टी क्र. ३७

✍️ गणिताशी गट्टी क्र. ३७

२० वस्तूंची एकूण खरेदी किंमत x वस्तूंच्या एकूण विक्री किमतीएवढी आहे. जर या व्यवहारातील नफा २५% असेल तर x ची किंमत किती?


➡️प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत १०० रुपये आहे असे मानू.

म्हणून x वस्तूंची खरेदी किंमत =  १००x रुपये.
x वस्तूंची विक्री किंमत = २० वस्तूंची खरेदी किंमत

➡️म्हणून

x वस्तूंची विक्री किंमत = २० × १००
x वस्तूंची विक्री किंमत = २००० रुपये.

➡️ नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत
नफा = ( २००० - १००x ) रुपये

➡️( नफा / खरेदी किंमत ) × १०० = शेकडा नफा
[( २००० - १००x ) / १००x]  × १०० = २५
 ( २००० - १००x )/x = २५
  २००० - १००x  = २५x
  २००० = २५x + १००x
  १२५x = २०००
  x = २००० / १२५
 ➡️ x = १६


➡️ म्हणून x ची किंमत १६ आहे.

© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी

4 comments:

  1. पटपद्धतीवर आधारित पर्यायी उकल :

    २५% नफा म्हणजे विक्रीमूल्य खरेदीमूल्याच्या ५/४ पट. म्हणून २० वस्तूंच्या खरेदीमूल्याइतके विक्रीमूल्य मिळण्यासाठी वस्तूंची संख्या २० च्या ४/५ पट म्हणजेच २० × ४/५ = १६ हवी.

    दिलेल्या माहितीनुसार ही संख्या x आहे.

    म्हणून x ची किंमत १६ हे उत्तर.

    धन्यवाद.

    ReplyDelete
  2. छान पद्धत सर

    ReplyDelete
  3. खूपच छान अतिशय अप्रतिम clue सांगितलंत सरजी धन्यवाद.

    ReplyDelete
  4. धन्यवाद Unknown.
    धन्यवाद Suyesh Sir Dharmabad.

    ReplyDelete