Wednesday, March 4, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५९

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५९

राजेशच्या व त्याच्या वडिलांच्या सध्याच्या वयाची बेरीज ४८ वर्षे आहे. चार वर्षांपूर्वी वडिलांचे वय राजेशच्या वयाच्या चौपट होते तर चार वर्षानंतर  राजेशचे वय किती असेल?

➡️ उत्तर :-

राजेशचे सध्याचे वय x वर्षे मानू.

म्हणून,

त्याच्या वडिलांचे वय = ( ४८ - x ) वर्षे

➡️ चार वर्षांपूर्वी

राजेशचे वय = ( x - ४ ) वर्षे
त्याच्या वडिलांचे वय = ( ४८ - x - ४ ) = ( ४४ - x ) वर्षे

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

४४ - x = ४ (x - ४ )
४४ - x = ४x - १६
४४ + १६ = ४x + x
५x = ६०
x = ६० / ५
x = १२ वर्षे

राजेशचे सध्याचे वय १२ वर्षे आहे.

➡️म्हणून चार वर्षानंतर राजेशचे वय १६ वर्षे असेल.




© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

1 comment:

  1. पर्यायी उकल :

    राजेश व वडील यांच्या वयाची बेरीज ४८ आहे. म्हणून चार वर्षांपूर्वी ही बेरीज ४० असेल. त्यावेळी राजेशच्या वयाच्या ४ पट वडिलांचे वय होते. म्हणून त्यांच्या वयाची बेरीज राजेशच्या वयाच्या ५ पट होईल. यावरून राजेशचे वय तेव्हा ८ होते. म्हणून आजपासून चार वर्षांनी ते १६ वर्षे असेल.

    चार वर्षांनी राजेशचे वय १६ वर्षे असेल हे उत्तर.

    धन्यवाद.

    ReplyDelete