Wednesday, March 25, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६५

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ६५

१०० मीटर च्या शर्यतीत अमित सुमितला २ मीटर ने तर परमितला ९ मीटर ने हरवतो. जर शर्यत २८० मीटरची असेल तर सुमित परमितला किती मीटरने हरवेल?

➡️ उत्तर :-

अमित : सुमित = १०० : ९८
अमित : परमित = १०० : ९१

➡️ म्हणून,

सुमित : परमित = ९८ : ९१
सुमित : परमित = १४ : १३

➡️ दिलेल्या अटीनुसार,

सुमित जेंव्हा २८० मीटर ची शर्यत पूर्ण करेल तेंव्हा परमितने कापलेले अंतर
= (१३/१४ )× २८०
= १३ × २०
= २६० मी.

➡️ सुमित व परमित यांच्यातील अंतर = २८० - २६० = २० मी

म्हणून सुमित परमितला २० मीटरने हरवेल.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

2 comments:

  1. आजचा प्रश्न चांगला होता. इतका सोपा नव्हता. MCQ स्वरुपात असल्याने इतकी उत्तरं आली. नुसते उत्तर मागितले असते तर इतका प्रतिसाद शक्य नव्हता, असे मला वाटते.

    ReplyDelete
  2. I am waiting eagerly to get question. It tests my knowledge too. I enjoy it fully.

    ReplyDelete