Friday, August 28, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११०

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११०

एका वर्गातील ३० विद्यार्थी आणि वर्गशिक्षक यांच्या वयाची सरासरी १६ वर्षे आहे.  वर्गशिक्षक वगळता वयाची सरासरी १ ने कमी होते. तर वर्गशिक्षकांचे वय किती?

➡️ उत्तर :- 

वर्गशिक्षकांचे वय x वर्षे मानू. 

आपल्याला माहिती आहे की,

सरासरी = सर्व पदांची बेरीज / पदांची एकूण संख्या

➡️ म्हणून,

३० विद्यार्थी आणि वर्गशिक्षक यांच्या वयाची बेरीज 

= ( ३१ × १६

= ४९६ वर्षे ..........(i)

वर्गशिक्षक वगळता मुलांच्या वयाची बेरीज

 = ३० × १५ 

= ४५० वर्षे ......(ii)

➡️ म्हणून,

x = ४९६ - ४५० .....(समीकरण i व ii वरून)

x = ४६ वर्षे

➡️ म्हणून वर्गशिक्षकांचे वय ४६ वर्षे आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान

#गणिताशीगट्टी

2 comments:

  1. पर्यायी स्पष्टीकरण.
    वर्गशिक्षकांचे (वशि) वय १६ असते तर सरासरीत फरक पडला नसता. ज्याअर्थी सरासरी कमी झाली आहे त्याअर्थी वशि यांचे वय १६ हून जास्त असले पाहिजे. नवीन सरासरी १ ने कमी झाली आहे. म्हणजे ३० विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज ३१ जणांच्या बेरजेपेक्षा ३० ने कमी आहे. ही घट झाली ती वशि यांचे वय १६ पेक्षा ३० ने जास्त होते म्हणून. म्हणजेच वर्गशिक्षकांचे वय १६ + ३० = ४६ वर्षे आहे.

    धन्यवाद.

    ReplyDelete