✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११४
संध्याने वाढदिवसाच्या निमित्ताने मुलांना वाटण्यासाठी १०५ चॉकलेट्स आणली होती. मुले कमी येतील असे वाटून तिने त्यावेळी उपस्थित सर्व मुलांना प्रत्येकी तीन चॉकलेट्स वाटून स्वतः ही तीन चॉकलेट्स घेतली . परंतु पाचच मिनिटांत आणखी काही मुलांचा घोळका तिला शुभेच्छा देण्यासाठी हजर झाला. गोंधळून न जाता संध्याने फटाफट आकडेमोड करून नंतर आलेल्या सर्व मुलांना प्रत्येकी दोन चॉकलेट्स वाटले. जर तिथे संध्यासहित एकूण ४० मुले असतील तर नंतर आलेला घोळका किती मुलांचा होता?
➡️ उत्तर :-
नंतर आलेली मुले x तर सुरुवातीला असलेली मुले y मानू.
➡️ पहिल्या अटीनुसार,
२x + ३y = १०५....... (i)
➡️ दुसऱ्या अटीनुसार,
x + y = ४०..........(ii)
∴ ३x + ३y = १२०......(iii) (समी. ii ला ३ ने गुणून)
➡️ समी (iii) मधून समी (ii) वजा करू
३x + ३y = १२०
- २x + ३y = १०५
(-) (-) (-)
-------------------------
x = १५
➡️ म्हणून नंतर १५ मुले आली होती.
©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी
Sir ganitashi gatti prashn 115 kevha takal plz lvkr taka
ReplyDeleteदर मंगळवारी आणि गुरुवारी प्रश्न टाकला जातो आणि बुधवारी व शुक्रवारी त्याची उत्तरे ब्लॉगवर प्रकाशित होतात.
ReplyDeleteSir x v y la 3 ni ka gunale
ReplyDelete