✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४३
२० रुपयांना ७ लिंबू खरेदी करून विजय २० रुपयांस ४ लिंबू या भावाने विकतो. एके दिवशी त्याला या व्यवहारात ४५० रुपये फायदा झाला तर त्याने त्यादिवशी लिंबू खरेदीसाठी किती रुपये गुंतविले असतील? (त्या दिवशी त्याच्याकडे आदल्या दिवसाचे लिंबू शिल्लक नव्हते वा खरेदी केलेल्या लिंबामध्ये एकही खराब नव्हते आणि गिऱ्हाईकांनी घासाघीस केल्यानंतरही त्याने भाव कमीजास्त केला नव्हता.)
➡️ उत्तर :-
विजयने त्या दिवशी एकूण x लिंबू घेतले होते असे मानू.
विजय २० रुपयांना ७ लिंबू खरेदी करतो
∴ एका लिंबाची खरेदी किंमत = २०/७ रुपये
∴ x लिंबाची खरेदी किंमत = २०x/७ रुपये.......(i)
➡️ विजय २० रुपयांना ४ लिंबू विकतो.
∴ एका लिंबाची विक्री किंमत = २०/४ रुपये
∴ x लिंबाची विक्री किंमत = २०x/४ रुपये ........(ii)
➡️ येथे विक्री किंमत > खरेदी किंमत.....( समी.i व ii वरून)
∴ या व्यवहारात नफा होईल.
➡️ आपल्याला माहिती आहे की,
नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत
∴ नफा = (२०x/४) - (२०x/७)........( समी. i व ii वरून )
∴ नफा = ( १४०x - ८०x )/२८
∴ नफा = ६०x/२८
∴ नफा = १५x/७ रुपये.......(iii)
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
१५x/७ = ४५०
∴ x = ४५० × ७/१५
∴ x = ३० × ७
∴ x = २१०
➡️ २१० लिंबू खरेदी करण्यासाठी द्यावी लागणारी रक्कम
= ( २०/७ ) ( २१० )
= २० × ३०
= ₹ ६००
➡️ त्या दिवशी विजयने लिंबू खरेदीसाठी ₹ ६०० गुंतविले असतील.
© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी
मला माझ्या गृपवार गणीताशी गट्टी हा उपक्रम सुरू करावयाचा आहे मार्गदर्शन व्हावे
ReplyDelete9423736127
Very good
ReplyDeleteया प्रश्नाचे थोडक्यात स्पष्टीकरण असे 20रुपये खरेदी किंमत असता विक्री किंमत 35रुपये म्हणून नफा 15रुपये. समजा त्याने X रुपये गुंतवणूक केली व 450रुपये नफा मिळाला म्हणून X=(450×20)÷15=600
ReplyDelete