Friday, December 13, 2019

गणिताशी गट्टी क्र.३६

✍️गणिताशी गट्टी क्र.३६

एका व्यापाऱ्याने आपल्या जवळील ३०० किलो तांदुळापैकी काही १५% नफ्याने तर उर्वरित २५% नफ्याने विकले. या संपूर्ण व्यवहारात जर त्याला १८%  नफा झाला असेल तर त्याने २५% नफ्याने किती किलो तांदूळ विकले?

➡️ त्या व्यापाऱ्याने x किलो तांदूळ १५% नफ्याने तर २५% नफ्याने y किलो तांदूळ विकले असे मानू.

➡️ पहिल्या अटीवरून,

x + y = ३०० ......(i)

➡️ दुसऱ्या अटीवरून,

१५%x + २५%y = १८%(x + y )
१५x/१०० + २५y/१०० = १८(x + y )/१००
१५x + २५y = १८ (x + y ) ......( १०० ने गुणून )
१५x + २५y = १८x + १८y
१५x - १८x + २५y - १८y = ०
-३x + ७y = ० .......(ii)

➡️ समीकरण (i) ला ३ ने गुणून

३x + ३y = ९०० ......(iii)

➡️ समीकरण (i) व समीकरण (iii) यांची बेरीज करून

१०y = ९००
y = ९००/१०
y = ९०

➡️ म्हणून त्या व्यापाऱ्याने २५% नफ्याने ९० किलो तांदूळ विकले.


© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

9 comments:

  1. पर्यायी उकल / वेगळा विचार:
    समजा, एका काल्पनिक तराजूच्या दोन पारड्यांपैकी एक १.१५ (१५% नफा) आहे व दुसरे १.२५ (२५% नफा) आहे. १.१५ या पारड्यातील वस्तूचे वजन १.१५ ने गुणले जाते. तसेच १.२५ या पारड्याविषयी. या दोन्ही पारड्यांत काही किलो तांदूळ आहेत ज्यांची बेरीज ३०० किलो आहे. आता ही पारडी तोलणाऱ्या दोरीवर समतोलबिंदू १.१५ ते १.२५ या बिंदूंमध्ये फिरतो. दिलेल्या माहितीप्रमाणे तो १.१८ वर (१८% नफ्यावर) स्थिर आहे. या बिंदूची १.१५ व १.२५ पासूनची अंतरे ३:७ या प्रमाणात आहे. तेथील समतोल असे सुचवतो की १.१५ व १.२५ या पारड्यातील तांदुळांची वजने ७:३ या प्रमाणात असली पाहिजेत. ३०० किलोचे ७:३ या प्रमाणात भाग म्हणजे २१० किलो व ९० किलो. म्हणून १.२५ पारड्यात ९० किलो तांदूळ आहेत.

    २५% नफ्याने ९० किलो तांदूळ विकले हे उत्तर.

    धन्यवाद.

    ReplyDelete
  2. पहिला विचार योग्यच आहे पण वेगळा विचार हा genius चा विचार आहे.

    ReplyDelete
  3. दोनही स्पष्टीकरण छान

    ReplyDelete
  4. धन्यवाद सर्वश्री सुरेश देशपांडे, नवनाथ कोळपे, डी. जे. राठोड, Unknown व सूर्यकात.

    ReplyDelete