✍️ गणिताशी गट्टी क्र. ३७
२० वस्तूंची एकूण खरेदी किंमत x वस्तूंच्या एकूण विक्री किमतीएवढी आहे. जर या व्यवहारातील नफा २५% असेल तर x ची किंमत किती?
➡️प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत १०० रुपये आहे असे मानू.
म्हणून x वस्तूंची खरेदी किंमत = १००x रुपये.
x वस्तूंची विक्री किंमत = २० वस्तूंची खरेदी किंमत

➡️म्हणून
x वस्तूंची विक्री किंमत = २० × १००
x वस्तूंची विक्री किंमत = २००० रुपये.
➡️ नफा = विक्री किंमत - खरेदी किंमत
नफा = ( २००० - १००x ) रुपये
➡️( नफा / खरेदी किंमत ) × १०० = शेकडा नफा
[( २००० - १००x ) / १००x] × १०० = २५
( २००० - १००x )/x = २५
२००० - १००x = २५x
२००० = २५x + १००x
१२५x = २०००
x = २००० / १२५
➡️ x = १६
➡️ म्हणून x ची किंमत १६ आहे.
© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
➡️ म्हणून x ची किंमत १६ आहे.
© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी
पटपद्धतीवर आधारित पर्यायी उकल :
ReplyDelete२५% नफा म्हणजे विक्रीमूल्य खरेदीमूल्याच्या ५/४ पट. म्हणून २० वस्तूंच्या खरेदीमूल्याइतके विक्रीमूल्य मिळण्यासाठी वस्तूंची संख्या २० च्या ४/५ पट म्हणजेच २० × ४/५ = १६ हवी.
दिलेल्या माहितीनुसार ही संख्या x आहे.
म्हणून x ची किंमत १६ हे उत्तर.
धन्यवाद.
छान पद्धत सर
ReplyDeleteखूपच छान अतिशय अप्रतिम clue सांगितलंत सरजी धन्यवाद.
ReplyDeleteधन्यवाद Unknown.
ReplyDeleteधन्यवाद Suyesh Sir Dharmabad.