Friday, December 6, 2019

गणिताशी गट्टी क्र.३४

✍️गणिताशी गट्टी क्र.३४

आचार्य विद्यानिकेतन शाळेतील प्रत्येक तुकडीत ४० विद्यार्थी होते. नवीन प्रवेश झाल्यामुळे पाच तुकड्या वाढविण्यात आल्या.  त्यामुळे प्रत्येक तुकडीत ३५ विद्यार्थी तसेच एकूण तुकड्या २६ झाल्या तर शाळेत किती नवीन प्रवेश झाले?

➡️ आचार्य विद्यानिकेतन शाळेत x नवीन प्रवेश झाले असे मानू.

सध्या २६ तुकड्या आहेत म्हणजे पूर्वी २६ - ५ = २१ तुकड्या होत्या.

➡️ दिलेल्या अटीवरून,

४० × २१ + x = ३५ × २६
८४० + x = ९१०
x = ९१० - ८४०
x = ७०

➡️ म्हणून आचार्य विद्यानिकेतन शाळेत एकुण ७० नवीन प्रवेश झाले.

© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

5 comments:

  1. पर्यायी पद्धत

    प्रत्येकी ३५ विद्यार्थ्यांच्या पाच तुकड्या वाढल्या. त्यासाठी एकूण ३५ × ५ = १७५ विद्यार्थी हवेत. पण जुन्या २१ तुकड्यांमधील विद्यार्थी प्रत्येकी ५ ने कमी झाले. म्हणून २१ × ५ = १०५ विद्यार्थी कमी झाले. हेही तुकड्यांच्या नवीन रचनेसाठी उपलब्ध झाले. म्हणजे नवीन तुकड्या करताना १७५ विद्यार्थी न लागता १७५ - १०५ = ७० विद्यार्थी पुरेसे झाले. हे ७० विद्यार्थी नवीन प्रवेश घेतलेले विद्यार्थी होत.

    म्हणून शाळेत ७० नवीन प्रवेश झाले हे उत्तर.

    ReplyDelete
  2. अगदी बरोबर आहे पध्दत सर
    असे मला वाटते आहे

    ReplyDelete
  3. धन्यवाद महेश.
    धन्वयवाद Unknown.

    ReplyDelete