✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५३
काही पुरुष एक काम ५० दिवसात पूर्ण करतात. जर पुरुषांची संख्या १० ने वाढली तर ते काम पूर्ण करण्यास २० दिवस कमी लागतात. सुरुवातीला किती पुरुष होते?
➡️उत्तर :-
सुरुवातीला x पुरुष होते असे मानू.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
( x + १० ) / x = ५० / ३०
३( x + १० ) = ५x
३x + ३० = ५x
३० = ५x - ३x
३० = २x
x = ३०/२
x = १५
म्हणून सुरुवातीला १५ पुरुष होते.
©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी
काही पुरुष एक काम ५० दिवसात पूर्ण करतात. जर पुरुषांची संख्या १० ने वाढली तर ते काम पूर्ण करण्यास २० दिवस कमी लागतात. सुरुवातीला किती पुरुष होते?
➡️उत्तर :-
सुरुवातीला x पुरुष होते असे मानू.
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
( x + १० ) / x = ५० / ३०
३( x + १० ) = ५x
३x + ३० = ५x
३० = ५x - ३x
३० = २x
x = ३०/२
x = १५
म्हणून सुरुवातीला १५ पुरुष होते.
©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी
पर्यायी उकल :
ReplyDeleteआरंभी काही पुरुष एका दिवसात १/५० काम करत होत्या. त्या व्यक्तींमध्ये दहांची भर पडल्यावर आता एका दिवसात १/३० काम होते. यात फरक २/१५० किंवा १/७५ काम इतका आहे. हा फरक १० पुरुषांमुळे पडला.
यावरून प्रत्येक पुरुष प्रतिदिनी १/७५ ÷ १० = १/७५० इतके काम करतो.
प्रतिदिनी १/५० काम पूर्ण होण्यास पुरुषांची संख्या १/५० ÷ १/७५० = ७५०/५० = १५ हवी.
यावरून आरंभी १५ पुरुष होते हे उत्तर.
धन्यवाद.
पर्याय २. पुरुष संख्या व काम पूर्ततेसाठी दिवस संख्या या व्यस्त प्रमाणात असतात. म्हणून
ReplyDeleteआरंभ पुरुष संख्या ÷ वाढलेली पुरुष संख्या =
घटलेली दिवस संख्या ÷ आरंभ दिवस संख्या.
वियोग क्रियेनुसार अंश ÷ (छेद - अंश) करून
आरंभ पुरुष संख्या ÷ वाढ =
घटलेली दिवस संख्या ÷ घट
म्हणून आरंभ पुरुष संख्या ÷ १० = ३० ÷ २०
यावरून आरंभ पुरुष संख्या = १५
आरंभी १५ पुरुष होते हे उत्तर.
धन्यवाद.