✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५६
२ डझन रबरी चेंडू ९०० रुपयांना विकल्यामुळे ६ रबरी चेंडूच्या खरेदी किमतीएवढा तोटा होतो तर एका रबरी चेंडूची खरेदी किंमत किती?
➡️ उत्तर :-
२ डझन रबरी चेंडूची विक्री किंमत = ₹ ९०० .......(i)
या व्यवहारात होणारा तोटा = ६ रबरी चेंडूची खरेदी किंमत
➡️ म्हणून,
२डझन रबरी चेंडूची खरेदी किंमत - २ डझन रबरी चेंडूची विक्री किंमत
= ६ रबरी चेंडूची खरेदी किंमत

२डझन रबरी चेंडूची खरेदी किंमत - ६ रबरी चेंडूची खरेदी किंमत
= २ डझन रबरी चेंडूची विक्री किंमत
➡️ २४ रबरी चेंडूची खरेदी किंमत - ६ रबरी चेंडूची खरेदी किंमत
= ९०० ........(i वरून )
१८ रबरी चेंडूची खरेदी किंमत = ९००
➡️ म्हणून,
एका रबरी चेंडूची खरेदी किंमत = ९००/१८
एका रबरी चेंडूची खरेदी किंमत = ₹ ५०
म्हणून एका रबरी चेंडूची खरेदी किंमत ₹ ५० आहे.
©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी
पर्यायी उकल :
ReplyDelete२४ चेंडूंच्या खरेदीवर ६ चेंडूंच्या खरेदीइतका तोटा.
म्हणजे खरेदीच्या ७५% किंवा ३/४ पट इतके विक्रीमूल्य.
म्हणून खरेदी विक्रीच्या ४/३ पट.
एका चेंडूची खरेदी (९०० / २४ =) ₹ ३७.५०.
म्हणून एका चेंडूची विक्री = ७५/२ × ४/३ = ₹ ५०.
एका चेंडूची विक्री ₹ ५०/- हे उत्तर.
धन्यवाद.