✍️गणिताशी गट्टी क्र-१८
✍️संजय, सुजय आणि विजय अनुक्रमे ३, ४ आणि ५ किमी प्रतितास या वेगाने चालतात. ते पनवेलहुन अनुक्रमे ३, ४ आणि ५ वाजता पुण्याच्या दिशेने निघाले. जेंव्हा सुजय संजयला गाठतो तेंव्हा लगेच तो त्याला ( संजयला ) विजयसाठी संदेश देऊन परत पाठवतो तर विजयला तो संदेश किती वाजता मिळाला असेल ?
➡️ वेग = अंतर/काळ हे सूत्र आपल्याला माहिती आहेच.
सुजय संजयला x किमी अंतरावर गाठतो असे मानू.
संजयला तेवढे अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ = x/३ तास
सुजयला तेच अंतर कापण्यासाठी लागलेला वेळ = x/४ तास
परंतु सुजय संजयपेक्षा एक तास उशिरा निघाला होता.
➡️ म्हणून दिलेल्या अटीवरून,
(x/३) - (x/४) = १
(४x - ३x) / १२ = १
x = १२ किमी.
➡️ म्हणून सुजय संजयला पनवेलपासून १२ किमी अंतरावर गाठतो.
एवढे अंतर चालण्यासाठी संजयला १२/३ म्हणजेच ४ तास लागले.
➡️ संजय तीन वाजता पनवेलहुन निघाला होता.
म्हणून सुजयने संजयला (३+४) = ७ वाजता गाठले.
पाच वाजता पनवेलहुन निघालेल्या विजयने तोपर्यंत१० किमी अंतर कापले होते.
➡️म्हणजेच सात वाजता विजय आणि संजय एकमेकांपासून (१२-१०) = २ किमी अंतरावर होते.
➡️दोघांची चालण्याची दिशा परस्परविरुद्ध असल्याने सापेक्ष वेग (३+५) = ८ किमी प्रतितास राहील.
➡️म्हणून ते २ किमी अंतर कापण्यासाठी त्यांना लागलेला वेळ
= २/८ तास
=१/४ तास
= (१/४) × ६० मिनिटे
= १५ मिनिटे.
➡️म्हणून संजय विजयला ७:१५ वाजता संदेश देईल.
©अजित तिजोरे-८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी
प्रत्यक्ष संपूर्ण आकडेमोड न करता दिलेल्या विकल्पांच्या आधारे हा प्रश्र्न कमी वेळात सोडवता येईल आणि असे प्रश्र्न स्पर्धा परीक्षा मधे विचारतात तेव्हा उत्तराचा लवकरात लवकर अचूक अंदाज करणे हे साध्य असते. मला वाटतं की त्या दृष्टीने हा प्रश्र्न कसा सोडवावा हे सांगितले तर छान!
ReplyDelete