,✍️ गणिताशी गट्टी-२८
✍️ संत एकनाथ वसतिगृहात एकूण ४८ विद्यार्थी होते. परंतु नवीन आठ प्रवेश झाल्यामुळे दररोजचा खानावळीचा खर्च २४० रुपयांनी वाढला मात्र दरडोई सरासरी खर्च १० रुपयांनी कमी झाला. तर सुरुवातीस एका दिवसाचा खानावळीचा सरासरी खर्च किती होता?
➡️ सुरुवातीला दररोजचा दरडोई खर्च ₹x होता असे मानू.
म्हणून दररोजचा एकूण खर्च = ₹ ४८x
आठ नवीन विद्यार्थी आल्यामुळे दरडोई खर्च १० रुपयांनी कमी झाला.
➡️ म्हणून आता दररोजचा एकुण खर्च
= ५६(x-१०)
= ५६x - ५६० रुपये.
➡️ दिलेल्या अटीवरून,
५६x - ५६० - ४८x = २४०
८x = २४० + ५६०
८x = ८००
x = ८००/८
x = १००
➡️ सुरुवातीस सरासरी खर्च
=४८x
= ४८ × १००
= ४८०० रुपये.
➡️ म्हणून सुरुवातीस एक दिवसाचा खानावळीचा सरासरी खर्च ४८०० रुपये होता.
© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी
तोंडी कसे सोडवता येईल :
ReplyDelete५६ व ४८ यांचा लसावि ३३६ आहे. ३३६÷४८ - ३३६÷५६ = ७-६ = १
म्हणून ३३६०÷४८ - ३३६०÷५६ = ७०-६० = १०. (वजाबाकी-१)
आता आपल्याला असे हवे आहे की वरील २ भागाकारयुक्त संख्यांमध्ये ५६ चा अंश (अंश-५६) हा ४८ च्या अंशापेक्षा (अंश+४८) २४० ने जास्त हवा. सध्या दोन्ही अंश ३३६० असे आहेत.
यात अंश-५६ मध्ये २४० मिळवले तर वजाबाकी-१ चे उत्तर १० ऐवजी १०-२४०÷५६ असे येईल. [A]
ते आपल्याला १० यायला हवे. आता अंश-१ व अंश-२ दोन्हीमध्ये २४० मिळवले तर वजाबाकी-१ चे उत्तर १०+५-२४०÷५६ = १०+४०÷५६ असे येईल.
तेव्हा २४०÷५६ ÷ ४०÷५६ = ६ वेळा अंश-१ व अंश-२ मध्ये २४० मिळवले तर वजाबाकी-१ चे उत्तर १०+२४०÷५६ येईल.
म्हणजे अंश-१=अंश-२=३३६०+६×२४० = ४८०० असेल तर वजाबाकी-१=१०+२४०÷५६. [B]
A व B वरून अंश-१=४८०० व अंश-२=४८००+२४०=५०४० असेल तर वजाबाकी-१ = १०+२४०÷५६-२४०÷५६ = १०.
यावरून मूळ खर्च = ४८०० हे उत्तर
धन्यवाद.
Perfect 👌
ReplyDeleteधन्यवाद Unknown.
ReplyDelete