Friday, February 14, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५४

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५४

२ शर्ट आणि ३ साड्या यांची किंमत ३२०० रुपये आहे. तेवढ्याच पैशात ६ शर्ट आणि १ साडी घेता येते तर  ८ साड्यांची किंमत किती?

➡️ उत्तर :-

एका शर्टाची किंमत x रुपये तर एका साडीची किंमत y रुपये मानू.

म्हणून,

८ साड्यांची किंमत = ८y

➡️ पहिल्या अटीवरून,

२x + ३y = ३२०० .......(i)

➡️ दुसऱ्या अटीवरून,

६x + y = ३२०० .........(ii)

➡️ समीकरण (i) ला ३ ने गुणून,

६x + ९y = ९६०० .........(iii)

➡️ समीकरण (iii) मधून समीकरण (ii) वजा करून,

८y = ६४०० 

➡️म्हणून ८ साड्यांची किंमत ६४०० रुपये आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

1 comment:

  1. पर्चायायी उकल :
    चार शर्ट्स वाढले व दोन साड्या कमी झाल्या तरी एकूण किंमत बदलत नाही. यावरून चार शर्ट्सचे मूल्य व दोन साड्यांचे मूल्य समान आहे. म्हणून १ साडी = २ शर्ट्स. ही बाब पहिल्या अटीत वापरू. २ शर्ट्स + ३ साड्या = ३२००.
    म्हणून ४ साड्या = ३२००.
    म्हणून ८ साड्या = ६४००.
    ८ साड्यांची किंमत ₹ ६४००/- हे उत्तर.
    धन्यवाद.

    ReplyDelete