Friday, February 21, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५६

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५६

२ डझन रबरी चेंडू ९०० रुपयांना विकल्यामुळे ६ रबरी चेंडूच्या खरेदी किमतीएवढा तोटा होतो तर एका रबरी चेंडूची खरेदी किंमत किती?

➡️ उत्तर :-

२ डझन रबरी चेंडूची विक्री किंमत = ₹ ९०० .......(i)
या व्यवहारात होणारा तोटा = ६ रबरी चेंडूची खरेदी किंमत

➡️ म्हणून,

२डझन रबरी चेंडूची खरेदी किंमत - २ डझन रबरी चेंडूची विक्री किंमत 
= ६ रबरी चेंडूची खरेदी किंमत
२डझन रबरी चेंडूची खरेदी किंमत - ६ रबरी चेंडूची खरेदी किंमत
२ डझन रबरी चेंडूची विक्री किंमत 

➡️ २४ रबरी चेंडूची खरेदी किंमत - ६ रबरी चेंडूची खरेदी किंमत
= ९०० ........(i वरून )

१८ रबरी चेंडूची खरेदी किंमत = ९००

➡️ म्हणून,

एका रबरी चेंडूची खरेदी किंमत = ९००/१८

एका रबरी चेंडूची खरेदी किंमत = ₹ ५०

म्हणून एका रबरी चेंडूची खरेदी किंमत ₹ ५० आहे.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

1 comment:

  1. पर्यायी उकल :
    २४ चेंडूंच्या खरेदीवर ६ चेंडूंच्या खरेदीइतका तोटा.
    म्हणजे खरेदीच्या ७५% किंवा ३/४ पट इतके विक्रीमूल्य.
    म्हणून खरेदी विक्रीच्या ४/३ पट.
    एका चेंडूची खरेदी (९०० / २४ =) ₹ ३७.५०.
    म्हणून एका चेंडूची विक्री = ७५/२ × ४/३ = ₹ ५०.
    एका चेंडूची विक्री ₹ ५०/- हे उत्तर.
    धन्यवाद.

    ReplyDelete