Wednesday, February 26, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५७

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ५७

एका महाविद्यालयात ५ परीक्षक रोज ६ तास काम करून पेपरचे गठ्ठे १२ दिवसात तपासतात तर त्याच्या दुप्पट गठ्ठे ८ परीक्षकांना १५ दिवसांत द्यायचे असतील तर रोज किती तास काम करावे लागेल?

➡️ उत्तर :-

८ परीक्षकांना १५ दिवसात पेपर्स तपासून देण्यासाठी रोज x तास काम करावे लागेल असे मानू.

५ परीक्षक रोज ६ तास काम करून पेपरचे गठ्ठे १२ दिवसात संपवतात.

म्हणून,
 त्यांनी केलेले एकूण काम = (५ × ६ × १२)

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

८ × १५ × x = २ ( ५ × ६ × १२)
x = २ ( ५ × ६ × १२) / ( ८ × १५ )
x = ६ तास

म्हणून ८ परीक्षकांना  १५ दिवसात पेपर्स तपासून देण्यासाठी रोज सहा तास काम करावे लागेल.



©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

1 comment:

  1. पर्यायी उकल :-

    पहिल्या चमूतील ५ परीक्षकांना पेपर तपासायला ७२ तास लागतात. जर पेपर दुप्पट असते तर काम व वेळ यांच्या समप्रमाणामुळे त्या परीक्षकांना १४४ तास लागले असते.

    दुसऱ्या चमूत ८ म्हणजे ५ च्या ८/५ पट परीक्षक आहेत. परीक्षक संख्या व वेळ यांच्या यांच्या व्यस्त प्रमाणामुळे त्यांना तेवढेच पेपर तपासायला १४४ च्या ५/८ पट म्हणजे ९० तास लागतील. हे काम १५ दिवसात करायला त्यांना प्रतिदिन ६ तास काम करावे लागेल.

    प्रतिदिन ६ तास काम करावे लागेल हे उत्तर.

    धन्यवाद.

    ReplyDelete