Wednesday, April 29, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७५

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ७५ 

काही ठराविक अंतर सागर ३ किमी प्रतितास या वेगाने ३ तास ४० मिनिटांत चालून पार करतो. जर तो चालण्याऐवजी १५ किमी प्रतितास या वेगाने पळत गेला तर ते अंतर कापण्यास त्याला किती वेळ लागेल?

➡️ उत्तर :-

आपल्याला माहिती आहे की,

वेग = अंतर / वेळ

➡️ म्हणून,

अंतर = वेग × वेळ

३ तास ४० मिनिटे = (३ + २/३) तास = ११/३ तास

सागर ने पायी कापलेले अंतर = ३ × ११/३ किमी
सागर ने पायी कापलेले अंतर =११ किमी 

➡️ दिलेल्या माहितीनुसार,

वेळ = अंतर / वेग
वेळ = ११/ १५ तास
वेळ = (११/१५) × ६० मिनिटे
वेळ = ४४ मिनिटे

सागरला ते अंतर कापण्यास ४४ मिनिटे लागतील.




©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

4 comments:

  1. प्रतिसाद देणार्याची सूची देणे बंद झाले वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. व्हाट्सअप्प समूहावर टाकली जाते.

      Delete