Wednesday, June 17, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८९

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ८९

एका फळविक्रेत्याला साडेतीन डझन केळी विकल्यानंतर ८ केळीच्या विक्री किमतीएवढा तोटा होतो. तर शेकडा तोटा काढा.

➡️ उत्तर :-

साडेतीन डझन केळी = ३.५ × १२ = ४२ केळी

तोटा = खरेदी किंमत - विक्री किंमत

४२ केळ्यांची खरेदी किंमत - ४२ केळ्यांची विक्री किंमत = ८ केळ्यांची विक्री किंमत

४२ केळ्यांची खरेदी किंमत = ४२ केळ्यांची विक्री किंमत + ८ केळ्यांची विक्री किंमत 

४२ केळ्यांची खरेदी किंमत = ५० केळ्यांची विक्री किंमत .....(i)

एका केळ्याची खरेदी किंमत x रुपये मानू.

➡️ म्हणून,

५० केळ्यांची खरेदी किंमत = ५० x रुपये
५० केळ्यांची विक्री किंमत = ४२x रुपये ....(समी i वरून)

➡️ म्हणून,

शेकडा तोटा = (तोटा / खरेदी किंमत )× १००
शेकडा तोटा = [(५०x - ४२x)/५०x] × १००
शेकडा तोटा = [ ८x / ५०x ] × १००
शेकडा तोटा = १६

➡️म्हणून त्या फळविक्रेत्याला शेकडा तोटा १६ झाला.




©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०



#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी



2 comments:

  1. खूप छान पध्दतीने समजले आहे
    मस्त मस्त

    ReplyDelete
  2. बुद्धीला चालना देणाऱ्या उदाहरणांमुळे माझी आणि गणित विषयाची चांगलीच गट्टी जमली आहे.उदाहरणाचे स्पष्टीकरण ही अगदी समजेल असेच असते.

    ReplyDelete