✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ११८
एक व्यापारी एक घड्याळ ४०० रुपयांस विकून २५% नफा मिळवत असेल तर त्या घड्याळाची खरेदी किंमत किती?
शॉर्टकट पद्धत पाहण्यासाठी खालील शब्दांवर क्लिक करा.
➡️ उत्तर :-
घड्याळाची खरेदी किंमत x रुपये मानू.
नफा = २५%
➡️म्हणून,
घड्याळाची विक्री किंमत
= x + x चे २५%
= x + २५x/१००
= १२५x/१००
= ₹ ५x/ ४
➡️दिलेल्या माहितीनुसार,
५x / ४ = ४००
∴ x = ४०० × ४ / ५
∴
x = ८० × ४
x = ₹ ३२०
➡️म्हणून घड्याळाची खरेदी किंमत ३२० रुपये आहे.
©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी
गणिताशी गट्टी प्रश्न क्र.119 चे उत्तर कृपया ग्रुपवर टाका,सर
ReplyDelete