✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १४२
सकाळी ८:१० वाजता उद्यान एक्सप्रेस मुंबईहून निघते आणि सकाळी ११ : ४० ला पुण्याला पोहोचते. सकाळी ९:१० ला मुंबई एक्सप्रेस पुण्याहून निघते आणि दुपारी १:१० ला मुंबईला पोहोचते. तर त्या दोन्ही एक्सप्रेस एकमेकींना किती वाजता ओलांडतील?
➡️ उत्तर :-
मुंबई एक्सप्रेस पुण्याहून निघाल्यानंतर त्या दोन्ही एक्सप्रेस एकमेकींना x तासांनी ओलांडतील असे मानू.
मुंबई ते पुणे अंतर y किमी आहे असे मानू.
➡️ आपल्याला माहिती आहे की,
वेग = अंतर / काळ
∴ उद्यान एक्सप्रेस चा वेग
= y/३.५ = y/(७/२) = २y/७ किमी प्रतितास
तर मुंबई एक्सप्रेसचा वेग = y/४ किमी प्रतितास
∴ x तासात मुंबई एक्सप्रेसने कापलेले अंतर = x (y/४) किमी
तर (x+१) तासात उद्यान एक्सप्रेसने कापलेले अंतर
= (x+१)(२y/७) किमी
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
x(y/४) + (x+१)(२y/७) = y
∴ y [(x/४) + २(x+१)/७] = y
∴ [ ७x + ८(x+१)]/२८ = १
∴ ७x + ८x + ८ = २८
∴ १५x = २८ - ८
∴ १५x = २०
∴ x = २० / १५
∴ x = ४/३ तास
∴ x = (४/३) × ६० मिनिटे
∴ x = ४ × २० मिनिटे
∴ x = ८० मिनिटे
∴ x = १ तास २० मिनिटे
∴ त्या दोन्ही एक्सप्रेस मुंबई एक्सप्रेस सुटल्यानंतर १ तास २० मिनिटांनी एकमेकींना ओलांडतील.
∴ मुंबई एक्सप्रेस सुटण्याची वेळ = सकाळी ९ : १० वा.
➡️ त्या दोन्ही एक्सप्रेस एकमेकींना ९ : १० + १ : २० = सकाळी १० : ३० वाजता ओलांडतील.
© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी
स्पष्टीकरण:
ReplyDeleteउद्यान एक्सप्रेस एकूण साडेतीन तास (= ७/२ तास) घेते. म्हणून ती एका तासात एकूण अंतराच्या २/७ अंतर कापेल. याचा अर्थ ९.१० वाजता तिने एकूण अंतराच्या २/७ अंतर कापलेले असेल. म्हणून एकूण अंतराच्या (१ - २/७ = ) ५/७ अंतर कापायचे उरले.
याच वेळी मुंबई एक्सप्रेस पुण्याहून निघेल. ती एकूण चार तास घेते. म्हणून ती एका तासात एकूण अंतराच्या १/४ अंतर कापेल. आता दोन्ही गाड्या एकमेकींच्या दिशेने धावत आहेत. म्हणून त्या एकत्रितपणे एकूण अंतराच्या (२/७ + १/४ =) १५/२८ इतके अंतर एका तासात कापतील.
यावरून त्रैराशिक मांडू. एकूण अंतराच्या १५/२८ अंतराला १ तास तर एकूण अंतराच्या ५/७ अंतराला किती तास?
येथील उत्तर = ५/७ × २८/१५ = ४/३ तास = १ तास + १/३ तास = १ तास २० मिनिटे.
म्हणून या दोन गाड्या एकमेकींना ९-१० + १-२० = १०-३० वाजता भेटतील.
धन्यवाद.