✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. १३३
नववी अ च्या वर्गातील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या दीडपट आहे. जर मुलांची संख्या ४ ने कमी असती आणि मुलींची संख्या ४ ने जास्त असती तर मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या दुप्पट झाली असती. तर नववी अ चा पट किती?
➡️ उत्तर :-
मुलींची संख्या = १.५ × मुलांची संख्या
∴ मुलींची संख्या / मुलांची संख्या = १५ / १०
∴ मुलींची संख्या : मुलांची संख्या = ३ : २
समान पट x मानू.
∴ मुलींची संख्या = ३x
मुलांची संख्या = २x
➡️ दिलेल्या माहितीनुसार,
( ३x + ४ ) / (२x - ४ ) = २ :१
∴ १ ( ३x + ४ ) = २ ( २x - ४ )
∴ ३x + ४ = ४x - ८
∴ ३x - ४x = -८ - ४
∴ - x = - १२
∴ x = १२
➡️ मुलींची संख्या = ३x
= ३ x
= ३ × १२
= ३६
➡️ मुलांची संख्या = २x
= २ x
= २ × १२
= २४
➡️ नववी अ वर्गाचा पट
= मुलींची संख्या + मुलांची संख्या
= ३६ + २४
= ६०
➡️ म्हणून नववी अ चा पट ६० आहे.
© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशीगट्टी
मुलांची संख्या चारने कमी झाल्यावर चारच्या दीडपटीने म्हणजे सहाने मुलींची संख्या कमी होती (= झाली असती) तर मुलींची संख्या पहिल्याप्रमाणेच मुलांच्या संख्येच्या दीडपट राहती (= राहिली असती). पण उदाहरणाप्रमाणे मुलींची संख्या चारने वाढली. म्हणजेच दीडपटीपेक्षा ती दहाने वाढली.
ReplyDeleteपरिणामी मुलांच्या संख्येच्या ती दुप्पट झाली. म्हणजेच दीडपटीपेक्षा ती अर्ध्या पटीने वाढली. यावरून मुलांच्या नवीन संख्येच्या अर्धा पट हे दहाच्या बरोबर (= समतुल्य) आहेत.
म्हणून मुलांची नवीन संख्या = २०.
म्हणून मुलांची पहिली संख्या = २० + ४ = २४.
म्हणून मुलींची पहिली संख्या = २४ × १.५ = ३६.
म्हणून नववी अ ची पटसंख्या = २४ + ३६ = ६०.
धन्यवाद.