✍️ गणिताशी गट्टी क्र.३२
शालेय शिक्षण आणि वाचनसंस्कृती परिषदेनिमित्त विद्यार्थ्यांच्या वाचनाची सद्यस्थिती जाणून घेण्याकरिता सर्व्हेक्षण कमी चाचपणी करण्यात आली. यामध्ये विविध भागातील २४२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्या चाचपणीतील विद्यार्थ्यांना शाळेव्यतिरिक्त वेळेत काय करायला आवडते? या प्रश्नास मिळालेले प्रतिसाद पुढील प्रमाणे आहेत.
१) १८२ जणांना वाचनाची, ७३ जणांना खेळाची तर ७७ जणांना टीव्ही पाहण्याची आवड आहे.
२) ५० विद्यार्थ्यांना वाचन व खेळ दोन्ही आवडतात , ५५ विद्यार्थ्यांना वाचन व टीव्ही पाहण्यास आवडते तर १७ विद्यार्थ्यांना खेळ व टीव्ही या दोन्हींची आवड आहे.
३) फक्त ७ विद्यार्थ्यांना वरील तिन्हींचीही आवड आहे.
तर किती विद्यार्थ्यांना वरीलपैकी एकही गोष्ट आवडत नाही?
A हा वाचन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे
B हा खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे तर
C हा टीव्ही पाहायला आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे असे मानू.
➡️ म्हणून
n(A) = १८२
n(B) = ७३
n(C) = ७७
➡️ तसेच
n( A ∩ B ) = ५०
n( B ∩ C ) = १७
n( A ∩ C ) = ५५
➡️ ७ विद्यार्थ्यांना वाचन, खेळ आणि टीव्ही पाहण्याची आवड आहे.
म्हणून
n( A ∩ B ∩ C ) = ७
➡️ आपल्याला माहिती आहे की,
n ( A ∪ B ∪ C )
= n(A) + n(B) + n(C) + n( A ∩ B ∩ C )
- [n( A ∩ B ) + n( B ∩ C )+ n( A ∩ C )]
= १८२ + ७३ + ७७ + ७ - [ ५० + १७ + ५५ ]
= ३३९ - १२२
= २१७
➡️ म्हणून २१७ विद्यार्थ्यांना वरील तीन पैकी कमीतकमी एक गोष्ट तरी आवडते.
➡️ वाचन , खेळ किंवा टीव्ही पाहणे यापैकी एकही गोष्ट न आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
= २४२ - २१७
= २५
➡️ म्हणून २५ विद्यार्थ्यांना वाचन, खेळ किंवा टीव्ही पाहणे यापैकी कशाचीही आवड नाही.
© अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी
ज्यांना संच सिद्धांत माहित नाही त्यांच्यासाठी :
ReplyDeleteज्यांना एकातरी गोष्टीची आवड आहे त्यांची संख्या काढू. म्हणजे २४२ उणे ही संख्या इतक्या विद्यार्थ्यांना कोणत्याच गोष्टीची आवड नाही असे सांगता येईल.
दिलेल्या आकड्यांमध्ये मेख अशी आहे की तीनही गोष्टी आवडणारे अन्य प्रत्येक संख्येत आहेत व दोन गोष्टी आवडणारे हे १ गोष्ट आवडणाऱ्यांच्या संख्येत आहेत.
प्रथम २ आणि फक्त २ गोष्टी आवडणारे किती ते काढू. यासाठी तीनही आवडणारे ७ काढून टाकू.
फक्त आणि फक्त वा(चन) व खे(ळ) : ५० - ७ = ४३
फक्त आणि फक्त खे व टी(व्ही) : १७ - ७ = १०
फक्त आणि फक्त वा व टी : ५५ - ७ = ४८
यावरून २ आणि फक्त २ आवडणारे एकूण १०१.
आता १ व फक्त १ गोष्ट आवडणारे किती ते काढू. यासाठी २ आणि फक्त २ आवडणारे तसेच तीनही आवडणारे ७ काढून टाकू.
फक्त आणि फक्त वा : १८२ - ४३ - ४८ - ७ = ८४
फक्त आणि फक्त खे : ७३ - ४३ -१० - ७ = १३
फक्त आणि फक्त टी : ७७ - १० - ४८ - ७ = १२
यावरून १ व फक्त १ आवडणारे एकूण : १०९
म्हणून निदान १ तरी गोष्ट आवडणारे एकूण :
१०९ + १०१ + ७ = २१७.
म्हणून एकही गोष्ट न आवडणारे :
२४२ - २१७ = २५.
एकही गोष्ट न आवडणारे २५ विद्यार्थी होते हे उत्तर.
धन्यवाद.
Thanks
ReplyDelete