Friday, January 10, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४४

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४४

मनीषने पनवेलजवळील आपले फार्महाऊस व पनवेलमधील घर प्रत्येकी तीस लाख रुपयांत विकले. घरविक्रीत त्याला २० % नफा तर फार्महाऊस विक्रीत त्याला २०% तोटा झाला. तर या संपूर्ण व्यवहारात मनीषला.........झाला.

➡️उत्तर :-

घराची खरेदी किंमत १०० रुपये आहे असे मानू.
नफा = २०%
➡️म्हणून
घराची विक्री किंमत = ₹ १२०

जर घराची विक्री किंमत तीस लाख असेल तर त्याची खरेदी किंमत
= १०० × ३० लाख / १२०
= २५ लाख
➡️घराची खरेदी किंमत = २५ लाख रुपये ........(i)

फार्म हाऊसची खरेदी किंमत १०० रुपये आहे असे मानू.
तोटा = २०%
➡️म्हणून
फार्म हाऊसची विक्री किंमत = ₹ ८०

जर फार्म हाऊसची विक्री किंमत तीस लाख असेल तर त्याची खरेदी किंमत
= १०० × ३०,००,०००/ ८०
= ३७,५०,०००

➡️फार्म हाऊसची खरेदी किंमत = ₹ ३७, ५०, ००० ........(ii)

म्हणून,
➡️घर व फार्म हाऊसची एकूण खरेदी किंमत
 = २५,००,००० + ३७, ५०,०००
= ₹६२,५०,०००

➡️घर व फार्म हाऊसची एकूण विक्री किंमत 
= २ × ३०,००,०००
= ₹६०,००,०००

➡️येथे खरेदी किंमत > विक्री किंमत

म्हणून,
तोटा = खरेदी किंमत - विक्री किंमत
तोटा = ६२,५०,००० - ६०,००,०००
तोटा = ₹ २,५०,०००

➡️ शेकडा तोटा = (तोटा / खरेदी किंमत) १००

शेकडा तोटा
= ( २,५०,०००/६२,५०,०००) १००
= ( २५ / ६२५) १००
= ( १/२५ ) १००
= ४

➡️ म्हणून या संपूर्ण व्यवहारात मनीषला ४% तोटा झाला.


©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

1 comment:


  1. पर्यायी उकल
    (समान विक्रीमूल्य ₹ ३००००००/- आहे या माहितीचा उपयोग न करता )

    दोन्ही समान विक्रीमूल्ये समजा ₹ १ आहेत.
    १) २०% तोटा; विक्रीमूल्य ₹ १; खरेदी? तोटा?

    २०% तोटा होतो तेव्हा विक्री खरेदीच्या ४/५ पट असते म्हणून खरेदी विक्रीच्या ५/४ पट असेल.
    म्हणून ₹ १ विक्री असताना खरेदी ₹ ५/४ असेल.
    या व्यवहारात तोटा ₹ १/४.

    २) २०% नफा; विक्रीमूल्य ₹ १; खरेदी? नफा?

    २०% नफा होतो तेव्हा विक्री खरेदीच्या ६/५ पट असते म्हणून खरेदी विक्रीच्या ५/६ पट असेल.
    म्हणून ₹ १ विक्री असताना खरेदी ₹ ५/६ असेल.
    या व्यवहारात नफा ₹ १/६.

    ३) कमी काय - नफा की तोटा?

    ₹ १/६ हा नफा व्यवहार १) मधील तोट्यापेक्षा म्हणजे ₹ १/४ पेक्षा कमी आहे.

    ४) दोन्ही व्यवहारातील एकूण खरेदी :

    ५/४ + ५/६ = २५/१२.

    ५) दोन्ही व्यवहारातील नक्त तोटा :

    १/४ - १/६ = १/१२.

    ६) नक्त तोट्याची टक्केवारी :

    एकूण खरेदी ₹ २५/१२ या रकमेच्या नक्त तोटा ₹ १/१२ हा १/२५ पट आहे. यावरून १०० खरेदी असेल तर तोटा १०० च्या १/२५ पट म्हणजे ४ असेल. म्हणजेच व्यवहारकर्त्याचा नक्त तोटा हा ४% आहे.

    ७) म्हणून संपूर्ण व्यवहारात मनीषला ४% तोटा झाला हे उत्तर.

    ८) टिप्पणी : या उकलीवरून हे स्पष्ट आहे की दोन्ही व्यवहारातील विक्रीमूल्ये समान असणे ही गोष्ट गणित सोडवायला पुरेशी आहे. समान विक्रीमूल्य अमुक एक (येथे ₹ ३० लाख) आहे या माहितीची गरज नाही.

    धन्यवाद.

    ReplyDelete