Wednesday, January 1, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४१

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४१
अमरचे वजन अकबराच्या वजनांपेक्षा जितके जास्त आहे तितकेच ते अँथनीच्या वजनांपेक्षा कमी आहे. जर तिघांच्या वजनांची बेरीज २२५ किलो असेल तर अमरचे वजन किती?

उत्तर :- 

➡️ अमरचे वजन x किलो , अकबराचे वजन y किलो तर अमरचे वजन z किलो मानू.

➡️म्हणून ,

x + y + z = २२५...........(i)

➡️दिलेल्या अटीवरून,

x - y = z - x

➡️म्हणून,

x + x = z + y
२x = z + y
२x + x = x + y + z ...... (समीकरणाच्या दोन्ही बाजूस x मिळवून)
३x = x + y + z
३x = २२५ .......( i  वरून )
x = २२५/३
x =  ७५ किलो.


➡️म्हणून अमरचे वजन ७५ किलो आहे.

©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

1 comment:

  1. पर्यायी उकल :
    तीन संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यावर पहिल्या व दुसऱ्यातील अंतर हे दुसऱ्या व तिसऱ्यातील अंतराएवढे असेल तर त्या तीन संख्यांची सरासरी मधल्या संख्येएवढी असेल / असते. म्हणून येथे अमरचे वजन ही तीन वजनांची सरासरी आहे. ही सरासरी २२५ किलो / ३ = ७५ किलो आहे.

    म्हणून अमरचे वजन ७५ किलो हे उत्तर.

    धन्यवाद.

    ReplyDelete