✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४३
मीराबाईने भाजीविक्रीतुन मिळवलेले ५१०० रुपये बँकेत जमा केले. त्यांनी ही रक्कम वीस, पन्नास आणि शंभर रुपयांच्या नोटांच्या स्वरूपातच जमा केली. जर तिन्ही नोटांची संख्या समान असेल तर मिराबाईंनी एकूण किती नोटा बँकेत जमा केल्या?
➡️उत्तर :-
मिराबाईंनी तिन्ही प्रकारच्या प्रत्येकी x नोटा बँकेत जमा केल्या असे मानू.
म्हणून,
मिराबाईंनी बँकेत जमा केलेल्या एकूण नोटा = ३x
➡️दिलेल्या अटीवरून,
२०x + ५०x + १००x = ५१००
१७०x = ५१००
x = ५१०० / १७०
➡️म्हणून
x = ३०
➡️ मिराबाईंनी बँकेत जमा केलेल्या एकूण नोटा
= ३x
= ३ × ३०
= ९०
©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

पर्यायी उकल :
ReplyDeleteतीन प्रकारची प्रत्येकी १ नोट घेऊन एक संच करू या. या संचातील रक्कम १०० + ५० + २० = ₹१७०. जर एकूण रक्कम वरील संचांच्या पूर्ण संख्येत जमा करता आली तर तीन्ही प्रकारच्या नोट्सची संख्या समान ही अट पूर्ण होईल. कारण जितके संच तितक्या ₹ १०० च्या नोट्स, तितक्या ₹ ५० च्या नोट्स व तितक्याच ₹ २० च्या नोट्स असे होईल.
प्रत्येकी ₹ १७० चे संच पूर्ण संख्येत मिळण्यासाठी ५१०० ला १७० ने निःशेष भाग जायला हवा. पण तो जातोय; कारण १७ त्रिक ५१. म्हणजे ३० पूर्ण संचात एकूण रक्कम ₹ ५१००/- होईल. यामध्ये प्रत्येक प्रकारच्या ३० नोट्स वापरल्या जातील. म्हणून एकूण नोटसंख्या ९० होईल.
मीराबाईंनी एकूण ९० नोट्स बँकेत जमा केल्या हे उत्तर.
धन्यवाद.