Friday, January 3, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४२

✍️ गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४२

राजश्रीला तिच्या वडिलांनी नवीन वर्षानिमित्त १०० च्या काही नोटा व ५०० च्या काही नोटा मिळून ५००० रुपये भेट दिले. तेंव्हा राजश्री आपल्या वडिलांना म्हणाली तुम्ही मला जेवढ्या पाचशे रुपयांच्या नोटा दिल्या तेवढ्या १०० रुपयांच्या दिल्या असत्या आणि जितक्या शंभर रुपयांच्या नोटा दिल्या तितक्याच ५०० रुपयांच्या नोटा दिल्या असत्या तर मला आता मिळाले त्यापेक्षा आठशे रुपये अधिक मिळाले असते. तर राजश्रीला तिच्या वडिलांनी ५०० रुपयाच्या किती नोटा दिल्या होत्या?

उत्तर :-

राजश्रीला तिच्या वडिलांनी १०० रुपयांच्या x नोटा तर ५०० रुपयांच्या y नोटा दिल्या होत्या असे मानू.

➡️ पहिल्या अटीवरून,

१००x + ५००y = ५०००
x + ५y = ५०  ........ [समिकरणास १०० ने भागून ]

➡️म्हणून

x = ५० - ५y .........(i)

➡️ दुसऱ्या अटीवरून,

५००x + १००y = ५८००
५x + y = ५८ ......( समिकरणास १०० ने भागून )
➡️ म्हणून,

५( ५० - ५y ) + y = ५८ .......( समीकरण i वरून)
२५० - २५y + y = ५८
- २४y = ५८ - २५०
- २४y = - १९२
y = -१९२ / -२४
y = ८
➡️म्हणून राजश्रीला तिच्या वडिलांनी ५०० रुपयांच्या ८ नोटा दिल्या होत्या.


©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०

#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

1 comment:

  1. पर्यायी उकल

    ५०० व १०० च्या नोटाच्या संख्यांपैकी जी लहान संख्या असेल तेवढ्या नोटांच्या अदलाबदलीने एकूण मूल्यात काहीच फरक पडणार नाही. उरलेल्या नोटा १०० च्या तरी असतील किंवा ५०० च्या तरी असतील. दिलेल्या माहितीप्रमाणे अदलाबदल केल्यावर मूल्य ₹ ८०० ने वाढेल. याचा अर्थ जास्तीच्या नोटा १०० च्या होत्या. यातील १ नोट बदलली की मूल्य (५०० - १०० =) ₹ ४०० ने वाढेल.म्हणून ₹ ८०० ने मूल्य वाढण्यास २ नोटा बदलायला हव्यात.

    आता नोटांच्या मूळ संचाकडे वळू. वर पाहिल्याप्रमाणे ५०० च्या नोटांपेक्षा १०० च्या २ नोटा जास्त होत्या. या नोटांचे ₹ २०० वजा केल्यावर ₹ ४८०० हे समान संख्येच्या ५०० व १०० च्या नोटांचे मूल्य आहे. ५०० व १०० ची प्रत्येकी १ नोट असेल तर मूल्य ६०० होते. म्हणून ₹ ४८०० मूल्यासाठी दोन्ही प्रकारच्या नोटा ८-८ हव्यात. यात ₹ १०० च्या दोन नोटा मिळवल्या की मूळ संचात ५०० च्या ८ व १०० च्या १० नोटा होत्या हे कळते.

    म्हणून राजश्रीच्या वडिलांनी तिला ५०० च्या ८ नोटा दिल्या होत्या हे उत्तर.

    धन्यवाद.

    ReplyDelete