Friday, January 24, 2020

गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४८

✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४८

पनवेलमधील सुकापूर गावाची लोकसंख्या १५००० आहे. त्यातील दोन तृतीयांश पुरुष तर उर्वरित स्त्रिया आहेत. जर गावातील ३०% पुरुष विवाहित असतील तर त्या गावातील किती टक्के स्त्रिया अविवाहित आहेत?

➡️उत्तर :-

सुकापूर गावाची लोकसंख्या = १५,०००
पुरुषांची संख्या = १५००० × २/३
पुरुषांची संख्या = १०,०००

➡️म्हणून,

स्त्रियांची संख्या = १५,००० - १०,०००
स्त्रियांची संख्या = ५,०००

➡️दिलेल्या माहितीनुसार,

गावातील विवाहित पुरुषांची संख्या
= १०,००० चे ३०%
= १०,००० × ३०/१००
= ३,०००

यावरून गावातील विवाहित स्त्रियांची संख्या = ३,०००

➡️ म्हणून,

सुकापूर गावातील अविवाहित स्त्रियांची टक्केवारी
= [ ( ५००० - ३०००) / ५००० ] × १००
= [ २००० / ५००० ] × १००
= ४०%

म्हणून सुकापूर गावातील ४०% स्त्रिया अविवाहित आहेत.




©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०


#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

1 comment:

  1. येथे सर्व पटींमध्ये व टक्क्यांमध्ये माहिती दिलीय व विचारलीय; त्यामुळे संख्यात्मक माहितीशिवाय (म्हणजे लोकसंख्या १५००० आहे या माहितीशिवाय) पुढीलप्रमाणे उत्तर मिळू शकेल.

    अविवाहित स्त्रियांची संख्या पटींमध्ये :
    १/३ - (२/३ × ०.३)
    = ४/३०.
    आता १/३ च्या किती पट ४/३० आहे ते पाहू :
    ही पट = (४/३०) / (१/३)
    = ४/१०.
    म्हणजे स्त्रियांच्या संख्येच्या ४/१० पट संख्येएवढ्या स्रिया अविवाहित आहेत.

    या प्रमाणाची (पटीची) टक्केवारी :
    ४/१० × १०० = ४०.
    म्हणून सुकापूर गावातील ४०% स्त्रिया अविवाहित आहेत हे उत्तर.

    धन्यवाद.

    ReplyDelete