✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४१
अमरचे वजन अकबराच्या वजनांपेक्षा जितके जास्त आहे तितकेच ते अँथनीच्या वजनांपेक्षा कमी आहे. जर तिघांच्या वजनांची बेरीज २२५ किलो असेल तर अमरचे वजन किती?
उत्तर :-
➡️ अमरचे वजन x किलो , अकबराचे वजन y किलो तर अमरचे वजन z किलो मानू.
➡️म्हणून ,
x + y + z = २२५...........(i)
➡️दिलेल्या अटीवरून,
x - y = z - x
➡️म्हणून,
x + x = z + y
२x = z + y
२x + x = x + y + z ...... (समीकरणाच्या दोन्ही बाजूस x मिळवून)
३x = x + y + z
३x = २२५ .......( i वरून )
x = २२५/३
x = ७५ किलो.
➡️म्हणून अमरचे वजन ७५ किलो आहे.
©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

पर्यायी उकल :
ReplyDeleteतीन संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यावर पहिल्या व दुसऱ्यातील अंतर हे दुसऱ्या व तिसऱ्यातील अंतराएवढे असेल तर त्या तीन संख्यांची सरासरी मधल्या संख्येएवढी असेल / असते. म्हणून येथे अमरचे वजन ही तीन वजनांची सरासरी आहे. ही सरासरी २२५ किलो / ३ = ७५ किलो आहे.
म्हणून अमरचे वजन ७५ किलो हे उत्तर.
धन्यवाद.