✍️गणिताशी गट्टी प्रश्न क्र. ४८
पनवेलमधील सुकापूर गावाची लोकसंख्या १५००० आहे. त्यातील दोन तृतीयांश पुरुष तर उर्वरित स्त्रिया आहेत. जर गावातील ३०% पुरुष विवाहित असतील तर त्या गावातील किती टक्के स्त्रिया अविवाहित आहेत?
➡️उत्तर :-
सुकापूर गावाची लोकसंख्या = १५,०००
पुरुषांची संख्या = १५००० × २/३
पुरुषांची संख्या = १०,०००
➡️म्हणून,
स्त्रियांची संख्या = १५,००० - १०,०००
स्त्रियांची संख्या = ५,०००
➡️दिलेल्या माहितीनुसार,
गावातील विवाहित पुरुषांची संख्या
= १०,००० चे ३०%
= १०,००० × ३०/१००
= ३,०००
यावरून गावातील विवाहित स्त्रियांची संख्या = ३,०००
➡️ म्हणून,
सुकापूर गावातील अविवाहित स्त्रियांची टक्केवारी
= [ ( ५००० - ३०००) / ५००० ] × १००
= [ २००० / ५००० ] × १००
= ४०%
म्हणून सुकापूर गावातील ४०% स्त्रिया अविवाहित आहेत.
©अजित तिजोरे - ८०९७६१७०२०
#ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान
#गणिताशी गट्टी

येथे सर्व पटींमध्ये व टक्क्यांमध्ये माहिती दिलीय व विचारलीय; त्यामुळे संख्यात्मक माहितीशिवाय (म्हणजे लोकसंख्या १५००० आहे या माहितीशिवाय) पुढीलप्रमाणे उत्तर मिळू शकेल.
ReplyDeleteअविवाहित स्त्रियांची संख्या पटींमध्ये :
१/३ - (२/३ × ०.३)
= ४/३०.
आता १/३ च्या किती पट ४/३० आहे ते पाहू :
ही पट = (४/३०) / (१/३)
= ४/१०.
म्हणजे स्त्रियांच्या संख्येच्या ४/१० पट संख्येएवढ्या स्रिया अविवाहित आहेत.
या प्रमाणाची (पटीची) टक्केवारी :
४/१० × १०० = ४०.
म्हणून सुकापूर गावातील ४०% स्त्रिया अविवाहित आहेत हे उत्तर.
धन्यवाद.